Kirit Somaiya : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना शिवसेनेतून मदत मिळत नाही. त्यामुळेच त्यांनी हम तो डूबेंगे ही ठाकरे तुम्हें भी ले डूबेंगे असा पवित्रा घेतला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. 


रश्मी ठाकरेंवरील आरोपांवर ठाम 


किरीट सोमय्या यांनी अलिबागमधील रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या मालकीच्या बंगल्याबद्दलच्या आरोपांबाबत ठाम असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले. सोमय्या यांनी म्हटले की, 12 जुलै 2021 रोजी मला,  रश्मी ठाकरे यांचे पत्र माहिती अधिकारात मिळाले. अन्वय नाईक यांची मालमत्ता, 19 घरं नावे केल्यास मी ऋणी राहील असा लिहिलं असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले. हे मे 2021 रोजीचं पत्र असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली हे सगळे बैठक झाली आणि रश्मी ठाकरे यांच्या नावे ही जागा गेली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. 


संजय राऊत वैफल्यग्रस्त


सोमय्या यांनी पुढे म्हटले की,  ठाकरे कुटुंबीयांचे नाव आल्यानंतर याबाबत मी भाष्य केले नव्हते. मात्र, राऊत यांनी अलिबाग बंगला खरेदी आणि पाटणकर यांनी खरेदी केलेली देवस्थान जमिनीचा मुद्दा बाहेर काढला. संजय राऊत यांना शिवसेना, ठाकरे कुटुंबीयांकडून कोणतीही मदत केली जात नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या राऊत यांनी हम तो डूबेंगे ही ठाकरे तुम्हें भी ले डूबेंगे असा पवित्रा घेत मुख्यमंत्री ठाकरे यांना अडचणीत आणणाऱ्या प्रकरणांवर भाष्य केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. 


आरोप करत असतील तर कागदपत्रे मागा


संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना सोमय्या यांनी म्हटले की, कुठल्याही व्यक्तीने आरोप केले आणि त्याच्याकडे पुरावे नसतील तर मला याबाबत काही विचारू नका असे सोमय्या यांनी म्हटले. संजय राऊत हे कुठलेही आरोप करत असून त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha