एक्स्प्लोर

शिवसेनेच्या प्रस्तावानं भाजप नेते संतापले, बैठकीतच सेना नेत्यांना सुनावलं!

मुंबई: भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या तिसऱ्या बैठकीत आज फारच तणाव पाहायला मिळाला. आजच्या बैठकीत दोन्ही पक्षांनी आपआपले प्रस्ताव समोर ठेवले. परंतु कोणीही प्रस्ताव मान्य न केल्यानं आता युतीचा तिढा वरिष्ठांकडे गेला आहे. पण शिवसेनेनं दिलेल्या प्रस्तावामुळे भाजपचा मात्र तिळपापड झाला आहे. शिवसेनेनं दिलेल्या प्रस्ताववर भाजप नेते चांगलेच संतापले. 'हे अपमानास्पद आहे, ही कुचेष्ठा खपवून घेतली जाणार नाही.' अशा शब्दात त्यांनी सेना नेत्यांना बैठकीतच सुनावलं. आजच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपले प्रस्ताव मांडले. सर्वात आधी भाजपकडून 114 जांगाचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला. तर त्यानंतर शिवसेनेनं भाजपसमोर 60 जागांचा प्रस्ताव ठेवला. पण हे दोन्ही प्रस्ताव फेटाळण्यात आले. ...अन् युतीच्या चर्चेत मिठाचा खडा पडला! आजच्या बैठकीत शिवसेनेचे उपनेते रविंद्र  मिर्लेकर यांनी 2014 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची मुंबईत ताकद वाढली आहे. तसेच जनाधारही वाढला आहे. असं सांगत भाजपला 60 जागांचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावानंतरच युतीच्या चर्चेत मिठाचा खडा पडला. या प्रस्तावानंतर भाजप नेतेही संतापले. 'हे अपमानास्पद आहे, ही कुचेष्ठा खपवून घेतली जाणार नाही.' अशा शब्दात शिवसेना नेत्यांना त्यांनी सुनावलं. भाजपकडून शिवसेनेला 114 जागेंचा प्रस्ताव: आशिष शेलार या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की,  ‘आमच्याकडून 114 प्रस्ताव शिवसेनेला  देण्यात आला. तर शिवसेनेकडून 60 जागेंचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामुळे यापुढे याबाबत चर्चा न करणं योग्य होईल. असं दोन्हीकडील नेत्यांना वाटतं. म्हणून यापुढील जागावाटपाबाबतची चर्चा आता वरिष्ठ पातळीवर केली जाईल.ट शिवसेनेची ताकद आणि जनाधार वाढल्यानं 60 जागेंचा प्रस्ताव: अनिल देसाई दरम्यान, याबाबत शिवेसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले की, ‘बदललेली परिस्थिती आणि शिवसेनेचा वाढलेला जनाधार यामुळे आम्ही भाजपला 60 जागांचा प्रस्ताव दिला. विधानसभा निवडणूक नंतर शिवसेनेची ताकद वाढली. आम्ही जी काम केली त्यामुळे जनाधार वाढला  त्यामुळे 60 जागा दिल्या. पण जागावाटपावर आता चर्चा होणं शक्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयानंतर गरज पडल्यास आम्ही पुन्हा चर्चा करु.’ दरम्यान, तिसऱ्या बैठकीनंतर भाजप आणि शिवसेनेमधील युतीची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध; मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं पेट्रोल-डिझेलच्या टंचाई मागचं कारण, म्हणाले....
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
Mahavitran : वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
Mumbai Metro Aqua Line: मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यात 'नीट' पेपर विक्रीचा धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Embed widget