एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेची तयारी जोरात, भाजपची फरफट सुरुच
मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युतीसंदर्भात चर्चेचं गुऱ्हाळ अद्याप सुरुच आहे. एकीकडे चर्चा सुरु असल्याचे सांगत शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामाही प्रसिद्ध केला आणि 227 जागांसाठी उमेदवार यादीही तयार केली. त्यामुळे शिवसेनेमागे भाजपची एकप्रकारे फरफट होताना दिसते आहे.
भाजप युतीच्या प्रतीक्षेत
शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी कॅम्पेनिंग सुरु केले असताना भाजपमध्ये काहीही हालचाली दिसत नाहीत. शिवसेनेसोबत युती होईल, या प्रतीक्षेत भाजप आहे. म्हणूनच भाजपचा जाहीरनामाही रखडला आहे.
शिवसेनेची तयारी
शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी ‘वचननामा’ प्रसिद्ध करत भाजपच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. एवढंच नव्हे, तर मुंबईतल 227 जागांसाठी उमेदावर यादीही अंतिम करण्यात आली आहे. शिवाय, 26 तारखेला उद्धव ठाकरेंची सभाही होणार आहे.
भाजपची तयारी कुठवर?
भाजपने मुंबई महापालिकेसाठी अद्याप 227 उमेदवारांची यादीही अंतिम केली नाही. मात्र, काल रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची दोन तासांहून आधिक वेळ भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी युती होण्याची वाट न बघता, स्वबळाची तयारी सुरु केली असताना भाजपकडून कोणतीही ठोस तयारी दिसत नाही. त्यामुळ शिवसेनेमागे भाजपची फरफट होते आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
ट्रेडिंग न्यूज
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement