एक्स्प्लोर
Advertisement
या मार्गांवर प्रवास टाळा, भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी होणार
राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या कार्यक्रमामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.
मुंबई : भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या कार्यक्रमामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.
मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना आज प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि ठाण्याहून येणाऱ्या अवजड वाहनांचा मार्ग बदलण्यात येईल, किंवा आजच्या दिवसासाठी प्रवेश बंद असेल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बीकेसीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी एससीएलआर मार्गावरुन प्रवास टाळण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
पूर्व उपनगरातील मुंबईकरांनी जेव्हीएलआर, एलबीएस रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मार्गांचा, तर पश्चिम उपनगरातील प्रवाशांनी एसव्ही रोड, लिंकिंग रोड या मार्गांचा वापर करावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
भाजपच्या बाईक रॅलीचा शिवसेना नगरसेविकेसह मुंबईकरांना फटका भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या स्वागत मिरवणुकीसाठी मुंबई भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळापासून बीकेसीपर्यंत हजारो बाईक्सची रॅली काढण्यात आली. यामुळे भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन झालं, मात्र याचा फटका मुंबईकरांना बसला. या बाईक रॅलीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. मुंबईकर सुमारे चार तास वाहतूक खोळंब्यात अडकले होते. तर शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांच्या 6.45 वाजताचं दिल्लीचं फ्लाईट मिस झालं. राजुल पटेल यांच्या मुलीचं दिल्लीत लग्न आहे आणि संध्याकाळी त्यांना हळदीच्या कार्यक्रमाला पोहोचायचं होतं. मात्र वाहतूक खोळंब्यामुळे त्यांचं फ्लाईट सुटलं आणि त्यांना 9 वाजता सूर्य फ्लाईटने दिल्लीला जावं लागलं. राजुल पटेल अशा एकट्या नसून अनेकांना या वाहतूक खोळंब्याचा फटका बसला.Traffic Guidelines for 06-04-2018 #TrafficUpdate pic.twitter.com/9SKamnEQl6
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 5, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement