एक्स्प्लोर

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन भाजपनं हात झटकले

आज के शिवाजी-नरेंद्र मोदी पुस्तकाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत भाजपनं हात झटकले आहे.

मुंबई : भाजप नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन वादंग उठलं असताना, आता भाजपनं या प्रकरणी हात झटकले आहेत. कारण या पुस्तकाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं भाजपच्या मीडिया सेलचे सहसमन्वयक संजय मयूख यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. मात्र, भाजप नेत्यांनी लिहिलेल्या, भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्याच कार्यालयात प्रकाशित झालेल्या पुस्तकाशी संबंध नसल्याची भूमिका भाजप कशी काय घेऊ शकतं, असा सवाल आता विचारला जात आहे. 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या शीर्षकावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. याबाबत भाजपाने सावध भूमिका घेत पक्षाचा या पुस्तकाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर जयभगवान गोयल यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. गोयलांच्या पुस्तकात पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करण्यात आल्यानं वादंग निर्माण झाला आहे. हे पुस्तक माध्यमांच्या हाती लागणार नाही, याची देखील काळजी घेतली जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, पुस्तक मागे घेऊ - पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ, असं लेखक जयभगवान गोयल यांनी म्हटलं आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचं गोयल यांनी सांगितलं. तसंच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, मी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी पुस्तकातील मजकूर माझ्या वैयक्तिक भावना आहेत. भारत लोकशाही राष्ट्र आहे. प्रत्येकाला आपल्या भावना मांडण्याचा अधिकार असल्याचेही ते म्हणाले. मोदींना शिवाजी महाराजांच्या रुपात पाहतो! "मोदींच्या येण्यामुळे जगभरात भारताचा गौरव वाढला आहे. यापूर्वी आपला देश धर्मशाळा बनला होता. आता सीएए लागू झालं आहे. आज मोदींनी त्यांना सन्मान दिला, नागरिकत्व दिलं. जसे शिवाजी महाराज निर्णय घ्यायचे, तसे निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या माझ्या भावना आहेत. मी मोदींना शिवाजी महाराजांच्या रुपात पाहतो. माझ्या या भावनांमुळे दुसऱ्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. संबंधित बातम्या -  NCP Protest Pune | पंतप्रधानांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने राष्ट्रवादीचं पुस्तकाविरोधात आंदोलन | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget