एक्स्प्लोर

'राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सेनेवर शरसंधान

मुंबई: शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडण्याची इच्छा नाही, असं वक्तव्य केलं असलं तरी भाजपनं सेनेला काडीमोड घेण्याचा सल्ला दिला आहे.   मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. 'राऊत साहेब तलाक केव्हा घेताय', असं शिर्षक देऊन भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली आहे.   राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सेनेवर शरसंधान   तसंच या पाक्षिकात उद्धव ठाकरेंची तुलना 'शोले' सिनेमातल्या जेलरच्या भूमिका साकारणाऱ्या 'असरानी' यांच्याशी करून खिल्ली उडवली आहे.   राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सेनेवर शरसंधान   एक नजर पाक्षिकातील लेखावर:   राऊत साहेब तलाक केव्हा घेताय?   महाभारतातला संजय आपल्या दिव्यदृष्टीनं कुरुक्षेत्रावरील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकवत असे. मात्र या 'संजया'ला मराठवाड्यात निजामाच्या बापानं केलेली विकासकामं दिसू नयेत? आणि ती आपल्या कार्याध्यक्षांना (उद्धव ठाकरेंना) सांगता येऊ नयेत हा दोष कोणाच्या दृष्टीचा म्हणायचा?   निजामाच्या बापाच्या बिर्याणीवर ताव मारायचा, बिर्याणीचं मिशीला लागलेलं तूप पुसत हात धुवायचे आणि यजमानाच्या नावानं बोटं मोडायची. ही कुठली 'सच्चाई' हे राऊत महाशयांनी जनतेला समजावून सांगावं.   निजामाच्या बापाचा जाच सहन होत नसेल तर राऊत महाशयांनी बाणेदारपणे सत्तेचे ताट लाथाडायला हवे होते. तसे करण्याचे धाडस श्रीमान राऊत दाखवत नाहीत. राऊत महाशयांनी भाजपा शिवसेना युतीचा इतिहास आपल्या कार्याध्यक्षांकडून माहिती करावा. युती टिकावी म्हणून भाजपने अनेकदा दोन नव्हे तर वीस पावलेही माघार घेतली होती.   शोलेमध्ये जेलर झालेला असरानी आपल्या पोलीस शिपायांना, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ असा हुकुम सोडतो. त्याच्या हुकूमाप्रमाणं सगळे पोलीस शिपाई डाव्या आणि उजव्या दिशेला पांगतात. असरानीच्या मागे एकही शिपाई उरत नाही. निजामाच्या बापाशी तलाक घेतला तर आपल्या मागे एकही आमदार राहणार नाही, अशी भीती कार्याध्यक्षांना वाटते की काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget