एक्स्प्लोर
दुचाकी घसरली, मागे बसलेली महिला बसच्या चाकाखाली
दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर पडून बसखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कल्याण : जवळपास महिनाभरापूर्वी कल्याणमधील शिवाजी चौक परिसरात उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला महिना उलटत नाही तोवर पुन्हा एकदा याच रस्त्यावर त्याच ठिकाणी दुचाकीचा तोल गेल्याने मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर पडून बसखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मनीषा भोईर (वय - 40) असं या मयत महिलेचं नाव असून त्या चिकन घर परिसर राहत होत्या.
मनीषा भोईर कल्याणमधील एका खाजगी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा आणि पती असा परिवार आहे. शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणादरम्यान रस्त्यांच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत.
मात्र, यामध्ये लेव्हलिंग न करण्यात आल्याने रस्ते वरखाली झाले आहेत. नागरिकांच्या जीवावर उठलेल्या अशा रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .
शिवाजी चौकात महिनाभरापूर्वी दुचाकी घसरुन पडली. यामुळे झालेल्या अपघातात आई - वडिलांबरोबर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आज दुपारी चार वाजताच्या सुमारास मनीषा भोईर यांचाही मृत्यू झाला.
मनीषा भोईर दुचाकीवर मागे बसून शाळेतून घराच्या दिशेने शिवाजी चौकातून जात होत्या. यावेळी केम्ब्रिज दुकानासमोरील उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरली आणि पाठीमागे बसलेल्या मनीषा भोईर रस्त्यावर पडल्या. त्या बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्या.
या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या भोईर यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र पूर्ण बस अंगावरुन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
क्राईम
Advertisement