एक्स्प्लोर
अंबरनाथमध्ये दोघांचा अपघाती मृत्यू, मृतांवरच गुन्हा
ट्रिपल सीट बसून वेगात येत असलेल्या तरुणांचा ताबा सुटल्यानं ते दुभाजकावर धडकले. यावेळी त्यांच्या मागून येत असलेल्या दुचाकीचा अचानक ब्रेक न लागल्याने त्यावरील दोघंही खाली पडले.
![अंबरनाथमध्ये दोघांचा अपघाती मृत्यू, मृतांवरच गुन्हा Bike Accident In Ambernath Kills To Fir Against Dead Youth Latest Update अंबरनाथमध्ये दोघांचा अपघाती मृत्यू, मृतांवरच गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/16090029/Ambernath-accident.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर रविवारी दुपारी पाच दुचाकीस्वार तरुणांचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर तीन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र बेदरकारपणे गाडी चालवून स्वतःच्याच मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर ग्रीनसिटीच्या दिशेने नवरेनगरकडे येणाऱ्या हायवेवरील तीव्र वळणावर हा अपघात झाला. ट्रिपल सीट बसून वेगात येत असलेल्या तरुणांचा ताबा सुटल्यानं ते दुभाजकावर धडकले. यावेळी त्यांच्या मागून येत असलेल्या दुचाकीचा अचानक ब्रेक न लागल्याने त्यावरील दोघंही खाली पडले.
जखमी झालेल्या तरुणांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र शुभम मलिक आणि लेविन कल्याणी या दोघांचा मृत्यू झाला, तर उर्वरित तिघं किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त पाचही तरुण अवघ्या 20 ते 22 वयोगटातले असून सगळे उल्हासनगरच्या सेक्शन 5 मधील रहिवासी आहेत.
एकमेकांचे मित्र असलेले हे पाच जण रविवारी फिरायला गेले होते, त्यानंतर घरी परत येताना हा अपघात झाला. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी बेदरकारपणे गाडी चालवून स्वतःच्याच मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)