Bihar Election 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणूकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होण्यास हरकरत नाही, असं संजय राऊत बिहार निवडणुकांबाबत बोलताना म्हणाले.
'बिहारमध्ये 31 वर्षांच्या तरुणाने देशातील भल्याभल्यांना आव्हान दिलंय, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु व्हायला हरकत नाही. निकाल हाती आल्यानंतर जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या कलांबाबत दिली.
संजय राऊत म्हणाले की, 'बिहार निडवणुकांचे निकाल अद्याप जाहिर झालेले नसले, तरी जे काही कल येत आहेत, त्यावरून एका तरूण नेत्यानं देशाच्या केंद्रीय सत्तेला, भल्या भल्या नेत्यांना आव्हान देऊन सर्वांसमोर एक ताकद उभी केली आहे. ज्याप्रकारे टक्कर तो देत आहे. याक्षणी कांटे की टक्कर सुरु आहे. पण मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होण्यास हरकरत नाही.'
'बिहारचा प्रचार जो आहे. हा पंतप्रधान मोदी, नितीश कुमार आणि भाजपचे इतर प्रमुख नेत यांनी केला. पण तो जंगलराज भोवतीच फिरत राहिला. खरं म्हणजे, 15 वर्ष कोणाचं जंगलराज होतं, हा तिथल्या लोकांना पडला होता. पण जेव्हा संपूर्ण निकाल हातात येतील, दुपारी 12 नंतर त्यावेळी लोकं जंगलराज विसरलेली असतील आणि मंगलराज सुरु झालेलं असेल.' ; असं संजय राऊत बोलताना म्हणाले.
एक्झिट पोल काय सांगतात?
एबीपी-सी-वोटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीला 104-128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महागठबंधनला 108-131 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त चिराग पासवान यांच्या एलजेपीला केवळ 1 ते 3 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांच्या पारड्यात 4 ते 8 जागा जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएम मतं मोजली जातील. नऊ वाजता पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. तर दुपारपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल, असं म्हटलं जात आहेत. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :