भिवंडी : तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत सॅनिटायझर वाहतूक करण्याच्या नावाखाली गुटका तस्करी करणाऱ्या कंटेनरला अन्न आणि औषध विभागाने 1 जून रोजी छापा टाकत सुमारे 37 लाखांचा गुटखा आणि 15 लाखांचा कंटेनर असा मुद्देमाल जप्त केला होता. या कार्यवाही दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता अन्न व औषध विभागामध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे एफडीए विभागाच्या सात अधिकाऱ्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली आहे. तसेच नारपोली पोलिस देखील घटनास्थळी असल्याने खळबळ उडाली आहे.
सदर घटनेमुळे अवैधरीत्या गुटखा विक्रीवर बंदी असताना मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात भिवंडी परिसरात अन्न आणि औषध विभागाने दोन मोठ्या कारवाया करून करोडो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. काही आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. मात्र त्यापैकी एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने अन्न व औषध विभाग तसेच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपीला अटक करून भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. तेथील अधिकारी कर्मचारी आणि अन्न औषध प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती, त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून अन्न व औषध विभागाच्या 7 अधिकाऱ्यांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यामुळे एकंदरीत पोलीस आणि एफडीए विभागात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून आधीपासूनच कोरोनाचा प्रसार ज्या गोष्टींमधून होऊ शकतो अशा तंबाखू सिगरेट आणि अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी व्यावसायिकांवर बंदी आणली आहे. त्यानंतर ही बहुतांश ठिकाणी गुटखा सर्रासपणे चढ्या दराने विकला जात असल्याने अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाने प्रतिबंधित गुटखा विक्री हाणून पाडण्यासाठी कंबर कसली असून मागील आठवड्यात तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील गोदमावर कारवाई करीत 88 लाखांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई केली होती. अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाच्या सह आयुक्तांना राहनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील मुनीसुरत कॉम्प्लेक्स या ठिकाणी एक कंटेनरमधून गुटखा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखालील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने कारवाई केली.
पाहा व्हिडीओ : कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसोबत एक दिवस! आशा वर्कर मनिषा बोऱ्हाडे
कारवाईमध्ये 100 गोणींमधून तब्बल 37 लाख 80 हजार रूपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला आहे. यासह कंटेनर किंमत 15 लाख असा एकूण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, ही गुटखा वाहतूक आयुर्वेदिक सॅनिटायझर, श्वान शाम्पू अशा वस्तू असलेल्या बॉक्समागे गोणी ठेवून करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली. अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार स्वतंत्र असला तरी त्यांच्याकडे चौकशीची यंत्रणा नसल्यामुळे मुद्देमाल जप्त केल्यानंतर आरोपीचा ताबा पोलिसांकडे देण्यात येतो आणि पोलीस आरोपीची चौकशी करतात. फक्त ज्या वेळी छापा टाकला जातो त्यावेळी मुद्देमाल जप्त करणे आरोपीला ताब्यात घेणे पंचनामा करणे अशी कामे अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी करत असतात. या दोन्ही प्रकरणात पंचनामा केल्यानंतर जे आरोपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, त्यातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाली असल्याचे सह आयुक्त-दक्षता पथक, अन्न व औषध प्रशासन सुनील भारद्वाज यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितले. त्यामुळे त्या संशयित आरोपीच्या संपर्कात जे अधिकारी आणि पोलीस आले आहेत, त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून अन्न व औषध विभागाच्या 7 अधिकाऱ्यांचे कोरोना चाचणीचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे एकंदरीत पोलीस आणि एफडीए विभागात एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड-19 रूग्णालय; नवी मुंबई मनपाकडून अभिनव उपक्रम
ठाण्यातील सोसायट्यांना वृत्तपत्र नकोच, वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनची पोलिसांकडे धाव
गणोशोत्सवाबाबत सरकारचा निर्णय मान्य असेल, मुबंईतील गणोशोत्सव मंडळांची भूमिका
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद गरजू नाट्यकर्मीना करणार 1 कोटी 20 लाखांची मदत
लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!