मुंबई : काही महिन्यांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने आता पुढाकार घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून कोविड कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि पालिका यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे कृती दल प्रामुख्याने वॉर्ड स्तरावर काम करणार आहे. गणेशोत्सव मंडळे आणि यंत्रणांमध्ये समन्वय, जनजागृती अभियान तसेच सरकारने नियमावली लागू केल्यानंतर तिचे पालन होतं आहे की नाही यावरही कृती दल लक्ष ठेवणार आहे.
याबाबत बोलताना अॅडव्होकेट नरेश दहीबावकर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा याबाबत अनेक गणेश मंडळांचे एकमत झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात शक्य तितक्या उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या सर्व यंत्रणा कोरोना विरोधातील लढाईत एकवटले आहेत. ही बाब लक्षात घेता आगामी गणेशोत्सवात या यंत्रणेवर ताण येऊ नये तो कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशी कल्पना समोर आली आणि त्यातूनच हे कृती दल अस्तित्वात आले आहे.या कृती दलाची जबाबदारी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आली आहे. यानुसार निखिल गुडेकर, निखिल मौर्ये, बिपिन कोकाटे, प्रतीक जाधव आणि शिवाजी खैरनार यांच्याकडे प्राथमिक जबाबदारी असणार आहे. ज्या कार्यकर्त्यांना विभागास्तरीय कृती दलामध्ये सहभागी व्हायचे आहे अशा तरुणांनी कृती समितीशी संपर्क करावा.
Ganesh Utsav सरकार घेईल तो निर्णय मान्य,गणेश मंडळांची भूमिका,मुंबई गणेशोत्सवाबाबतचा निर्णय शासनाकडे
एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा थाटामाटात साजरा करता येणार नाही. सध्या राज्यावर आर्थिकमंदीचे देखील सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याकडे मंडळांसोबतच सामान्य नागरिकांचा देखील ओढा असणार आहे. आम्ही कृती दलाच्या माध्यमातून नागरिकांना देखील गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करत आहोत. याचा फायदा कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणार आहे.
संबंधित बातम्या :
- Corona Effect | वडाळा जीएसबी सार्वजनिक मंडळ माघी गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा करणार
- पुण्यात यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने होणार, मानाच्या 5 गणपती मंडळांच्या बैठकीत निर्णय