एक्स्प्लोर
भर रस्त्यात प्रेयसीची मनधरणी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई : भिवंडीत भर रस्त्यात प्रेयसीची मनधरणी करणाऱ्याला तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता हाच व्हिडीओ दोघांच्याही जीवावर बेतलाय. कारण समाजातील काही कट्टरपंथीयांनी या तरुणाला अपहरणाची धमकी दिली आहे. तसंच दोघांच्याही कुटुंबियांना धमकावण्यास सुरूवात केली आहे. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वास्तविक, भिवंडीमधील या जोडप्याचे दोनच महिन्यांमध्ये लग्न होणार होते. पण लग्नापूर्वी त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीला भररस्त्यात प्रपोज केल्याने कट्टरपंथीय तरुणांना ते खटकलं. त्यामुळे त्यांनी त्या कुटुंबियांच्या घरावर मोर्चा काढून याचा निषेध नोंदवला. तसेच कुटुंबियांसोबतच त्या जोडप्यालाही धमकावलं.
विशेष म्हणजे, या प्रकारामुळे या जोडप्याचं कुटुंब हादरुन गेलं आहे. या जोडप्यापैकी मुलीच्या वडिलांची तब्येत खराब झाली. तर कट्टरपंथीयांनी तरुणाला जबरदस्तीनं माफी मागण्यास भाग पाडलं, आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल केला.
दरम्यान, आता याप्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement