एक्स्प्लोर
संघावर बंदी लावली जाईल तेव्हाच देशातील मनुवाद संपेल : चंद्रशेखर आझाद
न्यायालयाने भीम आर्मीला तीन तासांची परवानगी दिली होती. चार वाजता चंद्रशेखर आझाद दाखल झाले. हातात तिरंगा ध्वज घेऊन ते मंचावर आले. यावेळी त्यांनी गुलामीपेक्षा मला 3 तासांची आझादी मान्य आहे, असं म्हटलं
नागपूर : या देशात मनुवाद तेव्हाच संपेल जेव्हा संघावर बंदी लावली जाईल. त्यामुळे संघावर बंदी लावलीच पाहिजे अशी मागणी भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी केली आहे. ते नागपुरात रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजपला संघ चालवतो. मात्र, संघ प्रमुख मोहन भागवत यांना माझं आव्हान आहे की त्यांनी भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी चालवण्याऐवजी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरावे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रेशीमबागेत सभा पार पडली. संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर पार पडलेल्या सभेत त्यांनी संघावरच जोरदार टीका केली.
ते म्हणाले की, हिम्मत असेल तर संघाने समोर येऊन मनुस्मृतीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून दाखवावी. एनपीआरला राज्य सरकार थांबवू शकते, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात एनपीआर थांबवावे. जर महाराष्ट्र सरकारने तसे केले नाही, तर आम्हाला त्यांच्या विरोधात उभे राहावे लागेल, मोर्चे काढावे लागतील असा इशारा आझाद यांनी दिला. सीएए आणि एनआरसी हे कायदे एका मोठ्या कटाचा भाग असल्याची टीका त्यांनी केली. सीएए विरोधात संघर्ष करत राहू, कुठल्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही, असंही आझाद म्हणाले.
संघाच्या अंगणात भीम आर्मीचा मेळावा; अटी-शर्थींसह चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला न्यायालयाची परवानगी
देशावर अनेक संकटे आजवर आली. मात्र, देशाच्या जनतेने त्यांना धूळ चारली. आज जी आंदोलन सुरू आहेत त्यांना माझा नमन आहे, ते जगाला दाखवत आहे की या देशात लोकशाही जिवंत आहे. आज मनुस्मृती आणि राज्यघटनेमध्ये संघर्ष आहे. आणि त्यात राज्यघटनाच जिंकणार, असेही ते म्हणाले.
आरक्षणाला विरोध करण्याऐवजी संघ प्रमुखांनी आरक्षणच्या मुद्द्यावर माझ्याशी उघड चर्चा करावी असं आव्हानही आझाद यांनी दिलं आहे. सभेच्या अखेरीस आझाद यांनी संपूर्ण देशाला मुस्लिमांचे आभार मानण्याचे आग्रह केला. मुस्लिमांनी तीन तलाक, कलम 370 आणि बाबरी मशिदीसाठीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही. मात्र, जेव्हा नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून राज्य घटनेवर संकट आले तेव्हा मुस्लिम बाहेर निघाले आणि आंदोलन सुरू केले, असं ते म्हणाले.
विशेष म्हणजे न्यायालयाने भीम आर्मीला 3 तासांसाठी मेळाव्याची परवानगी दिली होती. मात्र, चंद्रशेखर आझाद अखेरच्या एका तासासाठीच मेळाव्यात आले. या मेळाव्यात दलित तरुणांच्या तुलनेत मुस्लिम तरुण जास्त संख्येत उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement