एक्स्प्लोर

बेस्टचा दशकातील सर्वात दीर्घकालीन संप

दुसरीकडे बेस्टचा विद्युत पुरवठा विभागही संपात सहभागी झाला आहे. द इलेक्ट्रिक युनियनने संपाला पाठिंबा दिला आहे.

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. बेस्टचा हा दशकातील सर्वात दीर्घकालीन संप आहे. यापूर्वी 1997 साली बेस्टचा संप तीन दिवस लांबला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात अपयश आलं. त्यामुळे संप सुरुच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कर्मचारी संघनांनीनी घेतला आहे. त्वरीत तोडगा न निघाल्यास उद्यापासून महापालिकेचे सफाई, मलनिस्सारण, आणि रुग्णालयाचे कर्मचारी आंदोलनात उतरणार आहेत. विद्युत पुरवठा विभागाचाही पाठिंबा दुसरीकडे बेस्टचा विद्युत पुरवठा विभागही संपात सहभागी झाला आहे. द इलेक्ट्रिक युनियनने संपाला पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. बेस्टचा दशकातील सर्वात दीर्घकालीन संप
बेस्ट संपाचा इतिहास
1997 मध्ये तीन दिवसाचा संप झाला होता, तेव्हा बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शरद राव होते
2007 मध्ये महाव्यवस्थापक खोब्रागडे असताना संप झाला होता. हा संप तीन दिवसाचा होता. यावेळी महाव्यवस्थापकांनी काही कामगारांना तडकाफडकी कामावरुन काढून नवीन कामगार भरती केली होती, यावेळी कामगार नेते शरद राव अध्यक्ष होते
2011 मध्येही तीन दिवसाचा संप झाला होता
2017 मध्ये कामगार नेते शरद राव यांच्यानंतर शशांक राव यांनी धुरा सांभाळली. त्यावेळीही एक दिवसाचा संप झाला होता. तेव्हा मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बेस्टला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं
2019 मध्ये सर्वात लांबलेला संप. आज संपाचा चौथा दिवस आहे
उद्धव ठाकरेंची शिष्टाई अपयशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी मागील चार दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर स्वतः उद्धव ठाकरे अजाॅय मेहता, सुरेंद्र बागडे आणि बेस्ट कृती समितीच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. ही बैठक तब्बल सात तास चालली. तरीही या बैठकीत कुठलाही  तोडगा निघाला नाही.
बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याला आयुक्तांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप सुरुच राहणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितलं. "बाकीच्या मागण्यांवरही लेखी आश्वासन दिलेले नाही. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र मार्ग निघाला नाही," असंही शशांक राव यांनी सांगितलं. सोबतच "या संदर्भात आम्ही आधीच मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून मागण्यांवर विचार करुन आम्हाला काहीतरी लेखी द्या," अशी मागणी राव यांनी केली.
"या बैठकीत आयुक्तांनी बराच वेळ चर्चा केली. मात्र काहीच तोडगा निघाला नाही. हे आंदोलन कामगारांचं आहे. आम्ही कामगारांसमोर काय घेऊन जायचं. कामगारांचे स्पष्ट म्हणणं आहे की, असंही जगणे कठीण आहे. त्रासदायक आहे. त्यामुळे सन्मानजनक तोडगा काढावा," असं राव म्हणाले. "उद्या आम्ही कामगारांचा मेळावा घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ," असंही राव यांनी सांगितले.
बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका
बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून यामुळे सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे हा संप बेकायदेशीर असून न्यायालयाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्वरीत रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत अ‍ॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस धाडत शुक्रवारी (11 जानेवारी) सकाळी यावर तातडीची सुनावणी ठेवली आहे. विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. या संपात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सहभाग घेतला असून गेल्या दोन दिवसांपासून बेस्टच्या सुमारे 3700 बसेस विविध आगारात उभ्या आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात एक समिती स्थापन करावी. अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी (10 जानेवारी) ही याचिका सादर करण्यात आली. कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर कामावर जायचं नसेल तर बेस्ट वसाहतीतल्या खोल्या खाली करा, असा आदेशही बेस्ट प्रशासनाने दिला आहे. यामुळे भोईवाडा बेस्ट वसाहतीत बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि बेस्ट प्रशासनात जुंपली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांचे हाल होत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपातून शिवसेनाप्रणित कामगार सेनेनं माघार घेतली. पण, तरीही कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यास नकार दिला. संपाबाबत नामुष्की झाल्याची शिवसेनेची कबुली बेस्ट संपाबाबत झालेल्या नामुष्कीची शिवसेनेने कबुली दिली आहे. आदेश देऊनही आमच्या संघटनेतील कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत हे आम्ही मान्य करतो, असं शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितलं. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या - बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे - 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी - एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे - 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस - कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा - अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी संबंधित बातम्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंची शिष्टाई अपयशी बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका, उद्या सुनावणी बेस्टचा संप : तिसऱ्या दिवशीही बस रस्त्यावर नाही, बत्तीही गुल होणार? बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच बेस्टचा संप : टॅक्सीचालकांची मुजोरी, एसटी मुंबईकरांच्या मदतीला मुंबईत बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर, बस वाहतूक ठप्प
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget