बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार! वेतन कराराचा फेरविचार करा, अन्यथा 15 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. 15 ऑगस्टपर्यंत प्रमुख मागण्यांवर निर्णय न झाल्यास कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
BEST Employees Protest : बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. 15 ऑगस्टपर्यंत प्रमुख मागण्यांवर निर्णय न झाल्यास कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात 21 जून रोजी झालेल्या वेतन कराराचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांशी चर्चा न करता हा करार करण्यात आल्याने अनेक प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.
15 ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप होणार
सुधारित वेतनश्रेणी, महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सेवा-शर्ती, तोट्यातील बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत, प्रलंबित वेतन कराराची अंमलबजावणी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी 'समान काम, समान दाम' या प्रमुख मागण्या समितीने मांडल्या आहेत. तसेच, 15 ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Before You Go
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं






















