एक्स्प्लोर
Advertisement
येत्या 6 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा एल्गार
येत्या 6 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल गुरुवारी मागे घेण्यात आलं, मात्र त्याऐवजी संपाचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मुंबई : येत्या 6 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल गुरुवारी मागे घेण्यात आलं, मात्र त्याऐवजी संपाचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीनं गेल्या चार दिवसांपासून वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषण सुरु होतं. काल दुपारी झालेल्या सभेत कामगारांच्या इच्छेप्रमाणे उपोषण मागे घेत संपाची हाक देण्यात आली. 6 ऑगस्टपर्यंत आपल्या वेतनविषयक मागण्या मान्य न झाल्यास त्याच रात्रीपासून बेस्ट बंद करुन संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जात नाही. त्यामुळे मे महिन्याच्या थकलेल्या पगारापैकी अर्धा पगार 19 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यानंतर उर्वरित पगारासाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी 22 जूनला संपाचं हत्यार उपसलं होतं.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
सोलापूर
Advertisement