मुंबई: देशभरात 22 मार्चपासून आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाले आहेत. त्यातील काही सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरही होत आहेत. याचाच फायदा बेस्टला होत असल्याची माहिती समोर आली आहे.


आयपीएलच्या सामन्यांमुळे बेस्टच्या तिजोरीत भर पडली आहे. प्रेक्षकांमध्ये बसणाऱ्या लहान मुलांना वानखेडे स्टेडियमवर आणण्याचे काम बेस्ट उपक्रमाच्या 500 बसद्वारे केले जात आहे. त्यातून बेस्टला 60 ते 80 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे.


काल म्हणजेच 11 एप्रिलला झालेल्या मुंबई-बंगळुरु सामन्यासाठी बेस्टच्या 500 बस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यात वातानुकुलित, विनावातानुकूलित, दुमजली बसचा समावेश होता. या बसेसमधून 18 हजार विद्यार्थ्यांना वानखेडेवर आणण्याची जबाबदारी बेस्टकडे होती. एका बससाठी किमी अंतर आणि बस उभी करण्याचा कालावधी मोजून साधारणपणे 12 ते 18 हजार रुपये आरक्षण रक्कम भरावी लागते. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळे बेस्टला 60 ते 80 लाख रुपयांचा महसूल मिळतो. 


वानखेडे स्टेडियमवरील आगामी सामने


मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 14 एप्रिल रोजी मुंबई वि. चेन्नईत सामना रंगणार आहे. तर 3 मे रोजी कोलकाता विरुद्ध मुंबई भिडणार आहे. 6 मेला मुंबई विरुद्ध हैदराबाद आणि 7 मे रोजी मुंबई आणि लखनौचा सामना होणार आहे.


संबंधित बातम्या:


आरसीबीच्या अडचणी वाढल्या, मुंबईला मोठा फायदा; पाहा आयपीएलचे Latest Points Table


रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video


MI vs RCB IPL 2024: आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, मैदानात कोहलीला बॉलिंग देण्याची मागणी, विराटच्या रिॲक्शनची चर्चा