IPL 2024 Latest Points Table: आयपीएल 2024चा 25 वा सामना गुरुवारी झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मैदानात उतरली होती. पाहिले तर या हंगामात टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक होते. पण मुंबईच्या संघाने हा सामना अगदी सहज जिंकला. तसेच आरसीबीविरुद्धच्या या विजयासह मुंबई संघ गुणतालिकेत स्वतःला सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरला.


आरसीबीच्या अडचणी वाढल्या-


आयपीएलचा 25वा सामना मुंबई आणि बंगळुरूसाठी खूप खास होता. गुणतालिकेत आपले स्थान बळकट करण्यासाठी दोघांनाही विजय आवश्यक होता. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने हा सामना अगदी सहज जिंकला. या सामन्यापूर्वी मुंबईने चार सामने खेळले होते. या विजयासह मुंबईचे केवळ दोन गुण होते आणि मुंबई इंडियन्स गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. तर बंगळुरू संघ 5 सामने खेळला आणि फक्त एकच सामना जिंकू शकला. आरसीबी संघ दोन गुणांसह 9व्या क्रमांकावर होता.


आता आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबईने पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन विजयी झाले आहेत. मुंबईचे आता चार गुण आहेत. आरसीबीबद्दल बोलायचे झाल्यास गुणांच्या बाबतीत ते अजूनही 9व्या स्थानावर आहे. आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी आरसीबीला फक्त एकच सामना जिंकता आला आहे.






आरसीबीचा पराभव-


आरसीबी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी विराट कोहलीची बॅट चालली नाही. मात्र आरसीबीच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली होती. फाफ डू प्लेसिसने 40 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांसह 61 धावा केल्या. रजत पाटीदारने 26 चेंडूत 3 चौकार आणि चार षटकारांसह 50 धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने 23 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. दिनेशने पाच चौकार आणि चार षटकार मारले होते. तरीही आरसीबीचा पराभव झाला. मुंबईने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला.


संबंधित बातम्या:


MI vs RCB IPL 2024: 'शाब्बास डीके, वर्ल्डकप...'; दिनेश कार्तिकची स्फोटक फलंदाजी, रोहित शर्माने भर मैदानात केलं कौतुक


रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video


MI vs RCB IPL 2024: आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, मैदानात कोहलीला बॉलिंग देण्याची मागणी, विराटच्या रिॲक्शनची चर्चा