Rohit Sharma And Virat Kohli: इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ विजयी मार्गावर परतला आहे. आयपीएलच्या 25व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bengaluru) 7 गडी राखून पराभव केला. या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने दोन सामने जिंकले आहेत.
आरसीबीने प्रथम खेळताना 196 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला झंझावाती सुरुवात करून दिली. रोहित आणि किशन यांच्यात 101 धावांची उत्कृष्ट आणि स्फोटक भागीदारी झाली. इशान किशनने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. तर रोहितने 24 चेंडूत 38 धावा केल्या.
विराट कोहलीची रोहित शर्मासोबत मस्ती-
धावांचा बचाव करताना आरसीबीची अवस्था वाईट होती, मात्र असे असतानाही विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा फलंदाजी करत असताना विराट अचानक त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या पायावर हात मारुन क्षेत्ररक्षणसाठी पुढे जातो. सुरुवातील रोहित शर्माला कोणी हात लावला ते समजले नाही, मात्र मग विराट कोहलीला पाहताच रोहित त्याला थम्प दाखवतो आणि मग दोघंही व्हिडीओमध्ये हसताना दिसतात.
सूर्यकुमार यादव आणि इशान किशनची आक्रमक खेळी-
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. पॉवरप्ले षटक संपण्यापूर्वीच इशान किशनने पन्नास धावा केल्या होत्या. किशनने 69 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकार मारले. सूर्यकुमार यादवने विरोधी गोलंदाजांचा चांगलेच धुतले. सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत 52 धावा केल्या. इशानकिशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या खेळीने मुंबई इंडियन्सचा सामना एकतर्फी झाला होता.
आज लखनौ विरुद्ध दिल्लीचा सामना-
आज आयपीएल 2024 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स Lucknow Super Giants) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना होणार आहे. हा सामना एकाना मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजचा हा सामना सुरु होईल.