एक्स्प्लोर

Mumbai Oxygen Supply: बीएआरसी करणार मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढत असताना ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला. खासदार राहुल शेवाळेंनी ऑक्सिजन तयार करण्यासाठी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राकडे मागणी केली होती, यासाठी सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे आता मुंबईला ऑक्सिजन बीएआरसीतून मिळणार आहे.

मुंबई: मुंबईतील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी 'भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रा'तील (बीएआरसी) शास्त्रज्ञांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता बीएआरसीने मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या प्लांटमधून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 50 लिटरचे सुमारे 10 सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असताना महाराष्ट्राला ऑक्सिजन तुटवड्याची समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत, खासदार राहुल शेवाळे यांनी बीएआरसीच्या अधिकारी-शास्त्रज्ञांसोबत संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बीएआरसीने विशेष प्लांट तयार करून पाण्यापासून ऑक्सिजनची निर्मिती करायला सुरुवात केली. या प्लांटमधून, प्रत्येकी 50 लिटर ऑक्सिजनचे सुमारे 10 सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत. हे सिलेंडर दक्षिण-मध्य मुंबईतील सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांना पुरविण्यात येणार असून मागणीप्रमाणे पुरवठा वाढविण्याची तयारीही बीएआरसीने दाखवली आहे. 

बीएआरसीच्या प्लांटसोबत खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलाझर्स (आरसीएफ) ने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. तसेच बीपीसीएलच्या वतीनेही असाच प्लांट लवकरच कार्यान्वित होणार आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून लवकरच दक्षिण-मध्य मुंबई ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येतून मुक्त होईल, असा विश्वास खासदार शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येबाबत 13 एप्रिल रोजी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर माझ्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ऑक्सिजन टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मी बीएआरसी, आरसीएफ, बीपीसीएल यांचे आभार मानतो. असं  खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं

ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यासोबतच बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी नागरिकांच्या वापरासाठी अद्ययावत असे मास्क तयार केले आहेत. हे मास्क एन 95 पेक्षाही जास्त सुरक्षित असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच रिमोट बॉडी टेम्परेचर मशीनही बीएआरसीने विकसित केले आहे.

'मुंबईकडून काहीतरी शिका' दिल्लीच्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला, BMCचं केलं कौतुक

आता मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार : मुख्यमंत्री

महानिर्मितीची ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम युद्धपातळीवर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची संकल्पना

रिलायन्सचे 'मिशन ऑक्सिजन' : दररोज विक्रमी 1000 टनहून अधिक ऑक्सिजनची निर्मिती

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget