एक्स्प्लोर
लग्नपत्रिका दाखवूनही बँकेचा पैसे देण्यास नकार, सरकारची घोषणा हवेतच?

मुंबई : लग्नखर्चासाठी अडीच लाख रुपयांची रक्कम काढता येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. मुंबईतल्या अंधेरी परिसरात राहणाऱ्या विकी कांगडा यांचं लग्न तोंडावर आलं आहे. मात्र लग्न पत्रिका दाखवूनही कॅनरा बँकेने अडीच लाखांची रक्कम देण्यास नकार दिल्याचा आरोप विक्की कांगडा यांनी केला आहे. गेल्या चार दिवसांपासून विकी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. दरम्यान या प्रकरणी कॅनेरा बँकेची बाजू मांडण्यासाठी आम्ही संबंधित शाखा मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कार्यालयात हजर नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया प्रतिक्षीत आहे.
आणखी वाचा























