एक्स्प्लोर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन जुलै महिन्यात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं राष्ट्रीय स्मारक लवकरच पूर्णत्वास येणार आहे. महापौर बंगल्यात हे अंडरग्राऊंड स्मारक होणार आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं राष्ट्रीय स्मारक लवकरच पूर्णत्वास येणार आहे. येत्या जुलै महिन्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेली टेंडर प्रक्रिया आता एमएमआरडीए महिनाभरातच पुर्ण करणार. यानंतर जुलै महिन्यात भूमीपूजनानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला सुरवात होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजाँय मेहता, बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी आणि एमएणआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या. गेली पाच वर्षे विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अखेरीस आता शिवसेनाप्रमुखांचं राष्ट्रीय स्मारक आकारास येणार आहे. मुंबई महापौर बंगल्यात असेल अंडरग्राऊंड स्मारक मुंबईतील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे अंडरग्राऊंड स्मारक बांधलं जाणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडं आहेत. ही झाडं न तोडता बंगल्याखाली स्मारक उभारण्यात येणार आहे. महापौर बंगल्याची 2300 स्क्वेअर फुटाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कमी पडली असती. नऊ हजार स्क्वेअर फूट जागेत बाळासाहेबांचं अंडरग्राऊंड स्मारक तयार होणार आहे. बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे. बंगल्याच्या आतील खोल्या आणि दालनांमध्ये बाळासाहेबांचे फोटो, स्मरणचित्रं, व्यंगचित्रं लावली जातील. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी, हॉल अशा वास्तू अंडरग्राउंड असतील. सध्याची महापौर बंगल्याची वास्तू ही हेरिटेज असल्यामुळे तिच्या मूळ रचनेत कोणतेही बदल केले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Vedpathak White Line Controversy: मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
मुंबईतील सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी परवानगीशिवाय पांढरी पट्टी; इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकचा 'तो' VIDEO व्हायरल
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार
मराठा समाजासंदर्भात सुरु केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका, जरांगे पाटलांची विनंती, मुख्यमंत्री उपमुख्यमत्र्यांसह विखे पाटलांचे मानले आभार

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Embed widget