एक्स्प्लोर

Bakari Eid: बकरी ईदला आणलेल्या बकऱ्यांवरून मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत वाद, लोकांनी सोसायटीच्या आवारात केलं हनुमान चालिसा पठण

Mira Road News: काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीत हा प्रकार घडला. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला. 

Mira Road:  मीरा रोडमधील (Mira Road News) एक हायफाय सोसायटीत बकरी ईदला (Bakari Eid) कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वाद झाल्याची घटना मुंबईतील एका सोसायटीत  घडली आहे. बकरी ईदनिमित्त दोन बकरे आणण्यात आले होते. हा प्रकार समाजातील लोकांना कळताच लोकांनी एकच गोंधळ घातला. यासोबतच लोकांनी सोसायटीच्या आवारात  हनुमान चालिसा पठण केलं. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला. 

सोसायटीत पोलीस बंदोबस्त तैनात 

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत राहणारे मोहसीन शेख यांनी बकरी ईदनिमित्त सोसायटीत दोन बकरे आणले होते. ही बाब सोसायटीत समजल्यानंतर सोसायटीतील काही  लोकांनी सोसायटीत एकत्र येत निषेध केला. बकऱ्याला बाहेर काढा अशी सोसायटीतील लोकांनी मागणी सुरु झाली. या गदारोळात लोकांनी हनुमान चालिसाचा पाठणही सुरू केले.  आणि जय श्री रामच्या घोषणा ही दिल्या. काशिमीरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचू  वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. डीसीपी जयंत बजबळे यांनी  लोकांची समजूत काढली आणि राग शांत केला. यात सोसायटीतील लोक आणि पोलिसांमध्ये थोडी बाचाबाची ही झाली. 

सोसायटीने बकरी ठेवण्यासाठी जागा दिली नाही

बकरी घेऊन आलेल्या मोहसीनच्या म्हणण्यानुसार, या सोसायटीत 200 ते 250 मुस्लिम कुटुंब राहतात . दरवर्षी बिल्डर आम्हाला बकरी ठेवण्यासाठी जागा देतो, पण यावेळी बिल्डरने सांगितले की आमच्याकडे जागा नाही, यासाठी तुमच्या सोसायटीशी बोला. मोहसीनच्या म्हणण्यानुसार त्यांनी सोसायटीकडे बकरी ठेवण्यासाठी जागा मागितली होती, पण सोसायटीने जागा दिली नाही. म्हणून मोहसीनने मंगळवारी पहाटे दोन बकऱ्या आणल्या. आम्ही सोसायटीत कधीच कुर्बानी देत नाही, आम्ही नेहमी कत्तलखान्यात किंवा बकऱ्यांच्या दुकानात बकऱ्याची कुर्बानी देतो, असं मोहसिनने सांगितलं आहे. तसेच जमलेल्या जमावाने गैरवर्तणूक आणि शिवीगाळ केल्याचा आरोप मोहसीनने केला आहे.  सोसायटीतील लोकांनी माञ सोसायटीत बकरी आणू शकत नाही, कुर्बानी देऊ शकत नाही असे सांगितले आहे.

आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण एकाच दिवशी येत आहे. अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाने हिंदू मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या. मात्र बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने त्यांची बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न देता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.तसेच त्या आषाढी एकादशीच्या दिवशी मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. धर्माच्या नावावर हिंसा भडकावणाऱ्यांनी यातून शिकवण घेण्यासारखे आहे.

 हे ही वाचा :

Ashadhi Ekadashi: 'यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही', नाशिकमधील गावातील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय 

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget