एक्स्प्लोर

Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचा मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी; बॉलिवूड सेलिब्रिटी राजकीय नेते येण्याची शक्यता

Baba Siddique Firing: बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी राजकीय नेते येण्याची शक्यता आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर काल(शनिवारी) गोळीबार झाला.या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी (Baba Siddique)यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आज बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान मारिन लाईन येथे दफनविधी होणार आहे.

मुस्लिम समाजाच्या पध्दतीनुसार दफनविधी होणार आहे. 8.30 वाजता दफनविधी होणार आहे. यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique)यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. मुस्लिम धर्मानुसार नमाज-ए-जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. 7 वाजता ही प्रार्थना त्यांच्या राहत्या घरी मकबा हाईट येथे होणार आहे, त्यानंतर त्यांचा दफनविधी बडा कब्रस्तान येथे होणार आहे.

ही घटना कुठे घडली?

आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधून तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी करनैल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती असून या प्रकरणात चौथा व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगप्रमाणेच एसआरए वादाच्याही अँगलने होणार असल्याची माहिती आहे.एबीपी माझाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) गोळीबार प्रकरणात तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोपीनी बाबा सिद्धीकी यांचा हत्येपुर्वी बाबा सिद्धीकीवर पाळत ठेऊन हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.   रात्री उशिरपर्यंत आरोपींची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून  चौकशी सुरू होती. आरोपींची आजच वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात  हजर केले जाणार आहे.  गुन्हे शाखेची पथकं फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी

बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र, गोळीबारावेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता आणि नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रियाTirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Walmik Karad: वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
Embed widget