Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दिकी प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली, मोहम्मद झिशान अख्तरच्या शोधात पोलिसाची टीम
Baba Siddique Death Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीचीदेखील ओळख पटली. चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती समोर आली आहे. फरार शिवानंद आणि चौथ्या आरोपीचा तीन राज्यांमध्ये पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध घेण्यात येतोय.
बाबा सिद्धीकी यांची हत्या करून पळालेल्या आरोपी शिवानंदचं शेवटी पनवेलमध्ये दिसून आला आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा आरोपी ज्या ज्या मार्गाने पळाला त्या त्या ठिकाणचे सीसीटिव्ही तपासले
आरोपीने वांद्रेहून रिक्षाने कुर्ला स्थानक गाठले, कुर्लाहून हार्बर ट्रेन पकडून आरोपी पनवेल स्थानकावर गेल्याचे तपासात समोर
सीसीटिव्हीचा माग काढत पोलिसांना तो शेवटी पनवेलमधील सीसीटिव्हीत आढळून आला आहे
पनवेलहून आरोपी एक्सप्रेसच्या मदतीने राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय
आरोपींच्या शोधासाठी उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. २००४ ते २००८ या काळात ते विविध खात्यांचे राज्यमंत्री तसेच म्हाडाचेही अध्यक्ष होते.
२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते.
या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते
४ जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती
प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते
पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले
जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले
या फरार आरोपीच्या शोघासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं उज्जेन (मध्यप्रदेश), हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांची माहिती
अभिनेता सलमान खानच्या घरावर ज्यावेळी हल्ला झाला. त्यावेळी देखील आरोपीचे नियोजन अशाच प्रकारे करण्यात आले होते
बाबा सिद्दिकी यांचं पार्थिव आज सायंकाळी 7 वाजता अंत्यदर्शनासाठी वांद्र्यातील निवासस्थानी आणलं जाईल.
रात्री 8 वाजता मरीन लाईन्स स्थानकाजवळील दफनभूमी येथे त्यांचे पार्थिव दफन केले जाईल
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची, त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
शवविच्छेदनासाठी सकाळीच बाबा सिद्धिकी यांचे शव कूपर रुग्णालयात नेण्यात आले
पहाटे 6 वाजताच्या दरम्यान लीलावती रुग्णालयातून कूपर रुग्णालयात नेण्यात आले.
बाबा सिद्दिकी यांच शवविच्छेदन जे जे रुग्णालयात होणार
गोळीबारात मृत्यू झाल्याने शवविच्छेदन जे जे रुग्णालयात होणार
संपूर्ण शवविच्छेदनाची होणार व्हिडिओग्राफी
डॉक्टरांचं पॅनल करणार शवविच्छेदन
घटनेत वापरलेली बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे
या घटनेत आरोपीने पिस्तूल वापरली असून 9.9mm ची गोळी चालवली आहे
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी समजताच अभिनेता सलमान खान याने लीलावती रुग्णालयात धाव घेतली. सलमान खानने बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
CM Eknath Shinde on Baba Siddique Shot Dead : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या बातमीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून मुख्यमंत्री शिंदे यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही केस फास्टट्रॅकमध्ये घेण्यात येणार असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
Baba Siddique Shot Dead : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी घटना असल्याचं म्हणत अजित पवारांनी यांच्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रावादी प्रवेश केला होता. जवळपास 48 वर्ष काँग्रेसमध्ये काम करुन बाबा सिद्दीकी यांनी हाती घड्याळ घेतलं होतं. पण दसऱ्याच्या दिवशी (दि.12) रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली.
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ माजली आहे. बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केला होता. पण दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरातील त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा खास मित्र संजय दत्तही रुग्णालयात पोहचला.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा त्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये बाबा सिद्दिकी यांच्या जागेवरच मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघा अज्ञातांनी सहा गोळ्या झाडल्या.
Baba Siddique shot in Mumbai | बाबा सिद्दिकींचा मृत्यू, खेरवाडी सिग्नलवर काय घडलं? | ABP Majha
पार्श्वभूमी
Baba Siddique Bandra Firing Case Update : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी येथील आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हा गोळीबार झाला आहे. त्यामध्ये दोन जणांना ताब्यात घेतलं असून पोलिस याचा तपास करत आहेत. आरोपींनी सिद्दिकी यांच्या हत्येसाठी जे पिस्तुल वापरले होते, ते जप्त करण्यात आले आहे. सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच अभिनेता संजय दत्त, अभिनेता सलमान खान यांनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली होती. सिद्दिकी यांच्या मृतदेहाचे कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर त्यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर गोळीबार झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -