Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी पंजाबमध्ये सापडला, भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट करण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या ताब्यात
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर झिशान अख्तर हा फरार आहे. त्याचा सहकारी पंजाब पोलिसांच्या हाती लागला असून मुंबई पोलिस त्याचा ताबा घेऊ शकतात.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा आरोपी सापाडला असून पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आहे. झिशान अख्तरच्या गँगमधील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे.
जालंदरमधील भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरी ब्लास्ट करण्याचा प्रयत्न असलेल्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे झिशान अख्तरच्या गँगमधील आहेत. झिशान अख्तर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सामील आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर झिशान सिद्दीकी फरार आहे. त्याच्या मागावर मुंबई पोलिस आहेत.
बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या
मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे येथील खेर वाडी सिग्नल येथे हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रात्री 11.27 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी बहराइच, उत्तर प्रदेश येथील रहिवासी हरीश कुमार, कैथल (हरियाणा) येथील गुरमेल बलजित सिंग, बहराइच (उत्तर प्रदेश) येथील धर्मराज कश्यप आणि पुणे (महाराष्ट्र) येथील रहिवासी प्रवीण लोणकर यांना अटक केली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली होती. बाबा सिद्दीकी हे रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित होते. तथापि, ते राजकारण आणि व्यवसायापेक्षा त्याच्या बॉलीवूड कनेक्शनमुळे अधिक प्रसिद्धीत राहिले.
कोण आहे झिशान अख्तर?
झीशान हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी आहे. टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा 9 गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. 7 जून 2024 रोजी जीशान तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी भेट झाली. त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला. गँगस्टर लॉरेन्सच्या सूचनेनंतर झीशानने बाबा सिद्दिकीची हत्या केली. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झिशान गुन्हेगार बनला. पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने ही कबुली दिली होती.
विक्रम ब्रारच्या सांगण्यावरून पहिला खून
लॉरेन्स गँगचा गँगस्टर विक्रम ब्रार याच्या सांगण्यावरून झीशानने सौरभ महाकालसह तरणतारणमध्ये पहिला खून केला होता. सौरभ महाकाल हा तोच व्यक्ती आहे ज्याने सलमान खानच्या घरी धमकीचे पत्र फेकून त्याला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती आणि पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमध्ये सामील होता. मुंबई पोलिसांनी त्याला यापूर्वीच अटक केली आहे.























