बाबा सिद्दिकींवर गोळीबार करुन मारेकरी धावत सुटले, दोघांच्या अटकेवेळी काय घडलं? चिल्ड्रन पार्कच्या सुरक्षारक्षकानं सगळं सांगितलं
Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्याऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारामुळं मृत्यू झाला तर राज कनोजिया या व्यक्तीच्या पायात एक गोळी लागली होती. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यप आणि हरियाणाच्या गुरमैल सिंह या दोघांना वांद्रे पूर्व येथील चिल्ड्रन पार्कमधून अटक केली. बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबारानंतर पुढील 25 मिनिटांमध्ये दोघांना अटक करण्यात आली होती. तिसरा आरोपी शिवकुमार गौतम फरार आहे.
दोघांना पोलिसांनी पकडलं तर एक जण फरार
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरेपी धावत निघाले होते. सुरुवातीला दूर्गा विसर्जनाची मिरवणूक सुरु असल्यानं त्यातील सहभागी व्यक्तींचे मोबाईल फोन चोरुन आरोपी पळून जात असल्याचा प्राथमिक संशय निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना घेरल्याचं पाहताच त्यांनी रस्ता बदलला आणि ते चिल्ड्रन पार्कमध्ये गेले. पोलिसांनी चिल्ड्रन पार्कमधून दोघांना अटक केली तर एक आरोपी गर्दीचा फायदा घेत तिथून पळून गेला.
चिल्ड्रन पार्कमध्ये आरोपींना पकडलं
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना चिल्ड्रन पार्कमध्ये पकडण्यात आलं. त्या पार्कचे सुरक्षारक्षक अनवर खान यांनी पोलीस आले तेव्हा ते जेवण बनवत होते, असं सांगितलं. पोलिसांसोबत पार्कमधील सर्व कोपऱ्यांमध्ये गेलो कारण अंधार होता आणि आरोपी लपून बसले होते. 25 मिनिटं शोध घेतल्यानंतर पोलिसांनी धर्मराज कश्यप तारांची जाळी पार करत असताना पकडलं. त्याचवेळी दुसऱ्या टीमनं गुरमैल सिंहला अटक केली. पोलिसांना पाहून शस्त्र फेकत त्यानं आत्मसमर्पण केलं.
पोलीस कर्मचारी श्याम सोनावणे यांच्या तक्रारीनुसार फटाक्यांचा आवाज आल्याचा समज झाला. जेव्हा बाबा सिद्दिकी कोसळले तेव्हा गोळीबार झाल्याचं लक्षात आल्याचं म्हटलं.
शिवकुमार गौतम फरार
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर शिवकुमार गौतम फरार आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करुन किला कोर्टात हजर केलं. कोर्टानं दोघांना 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंह यांच्याकडे पोलिसांना 28 जिवंत काडतुसं आढळली.
दरम्यान, शिवकुमार गौतम फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. दुसरीकडे बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शुभू लोणकर या अकाऊंटवरुन पोस्ट करत बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. पोलिसांनी यानंतर शुभम लोणकर याचा भाऊ प्रविण लोणकरला अटक केली आहे.
इतर बातम्या :