एक्स्प्लोर
डोंबिवलीत रिक्षाचालकाची मुजोरी, महिला होमगार्डला नाल्यात फेकलं
डोंबिवली : मुंबई उपनगरात रिक्षाचालकांची मुजोरी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. काही महिन्यांपूर्वी भिवंडीत एका एसटी चालकाला मारहाणीची घटना समोर आल्यानंतर, वाहतूक शाखेनं धडक कारवाई सुरु केली होती. पण तरीही रिक्षाचालकांची मुजोरी अजूनही कायम आहे. आता तर थेट मुजोर रिक्षाचालकांनं महिली होमगार्डला नाल्यात फेकलं आहे.
रविवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रवी गुप्ता नावाच्या रिक्षा चालकाने नोपार्किंगमध्ये आपली रिक्षा पार्क करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे वाहतूक नियंत्रित करत असलेल्या महिला होमगार्डने गुप्ताला रिक्षा पार्क करण्यास मज्जाव केला. यावेळी या दोघांमध्येही शाब्दिक वाद झाला. यानंतर महिला होमगार्डने स्वत: रिक्षात बसून रिक्षा रामनगर पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले.
पण रिक्षाचालकाने आपली रिक्षा पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी ठाकुर्लीच्या दिशेने दामटवली. पुढे जाऊन त्याने त्या महिला होमगार्डला मारहाण करुन धक्का देऊन नाल्यात फेकले, आणि तिथून पळ काढला. यावेळी त्या होमगार्डला दुखापत झाली असून, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी भिवंडीमध्ये एसटी चालकाला झालेल्या मारहाणीत एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर मुजोर रिक्षाचालकांविरोधात आरटीओने धडक कारवाई सुरु केली होती.
तर दुसरीकडं नाशिकमध्ये रिक्षा चालकांविरोधातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन, वाहतूक शाखेनं दोन दिवसात 300 बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला होता. पण तरीही रिक्षा चालकांची मुजोरी जैसे थेच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement