एक्स्प्लोर

मराठा क्रांती मोर्चाकडून सेना भवनसमोर शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना भवनासमोर शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, महाविकासआघाडी सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय.

मुंबई : मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आज शिवसेना भवनासमोर शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. मागील काही दिवसांपूर्वी शिवजयंती साजरी करण्यासाठी काही निर्बंध सरकारने लावले होते. याचा निषेध करत मराठा क्रांती मोर्चाने शिवजयंती साजरी करू न दिल्यास आम्ही शिवसेना भवनासमोर शिवजयंती साजरी करू अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा घेतला होता.

दोन दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चाने शिवसेना भवनासमोर काही फ्लेक्स लावले होते. या फ्लेक्समुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील या संपूर्ण परिसरात निर्माण झाले होते. याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक अंकुश कदम म्हणाले की, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांच्या ठीक ठिकाणी सभा होत आहेत. दौरे देखील होत आहेत. याला हजारोंची गर्दी देखील उपस्थित असते. यावेळी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स देखील पाळले जात नाही. अनेकजण मास्क देखील घालत नाहीत. अशी परिस्थिती असताना देखील मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. परंतु, शिवजयंतीला मात्र महाविकास आघाडी सरकारने साजरी करण्याबाबत अनेक निर्बंध लादले होते.

ही बाब अत्यंत चुकीची आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईमध्ये एक मोठी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या ट्रॅक्टर रॅलीला मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोरोना विषयक सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले होते. परंतु, तरीदेखील कोणत्याही प्रकारची कारवाई या सर्व कार्यकर्त्यांवर आणि नाना पटोले यांच्यावर देखील झाली नाही. याचा निषेध आम्ही करत आहोत. एकीकडे मंत्र्यांना परवानगी द्यायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील बांधवांना शिवजयंती साजरी करण्यापासून रोखायचं असा दुटप्पीपणा महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आम्ही दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची पोलखोल करणारे काही फ्लेक्स देखील शिवसेना भवनासमोर लावले होते.

आज आम्ही अत्यंत शांततेत शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करत होतो. या वेळी कोरोना विषयक सर्व नियम पाळण्यात देखील आले होते. परंतु, तरी देखील आम्हाला पोलिसांनी शिवजयंती साजरी करू दिली नाही. आम्ही महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही आज शांततेत शिवजयंती साजरी करणार होतो. परंतु, पोलीस प्रशासनाने आमच्यावर बळाचा वापर करून आम्हाला ताब्यात घेतलं. आमच्यासोबतच राज्यभरातून मुंबईमध्ये जे कार्यकर्ते येणार होते, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. अशा प्रकारची दडपशाही महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार होताना पाहायला मिळत आहे. आम्ही या कारवाईचा निषेध करतो. आम्हाला जरी पोलिसांनी अटक केली तरी आम्ही जामीन घेणार नाही. आम्ही आमचं आंदोलन जेलमध्ये देखील सुरू ठेवणार आहोत.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget