एक्स्प्लोर
बदलापुरात मद्यधुंद टोळक्याने पोलिसाचा डोळा फोडला!
बदलापूर : कात्रप भागातील शुभम बारच्या बाहेर एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला किरकोळ वादातून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारुती कोहिनकर असे जबर मारहाण झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
या पोलीस अधिकाऱ्याने एका तरुणास लघु शंका करण्यास मनाई केल्याने मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत कोहिनकर यांच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांना 20 टाके पडले आहेत. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या टोळक्याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहे.
पोलिसाला लाथा-बुक्क्याने मारहाण, डोळा फोडला
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कोहिनकर हे गुरुवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास कोहिनकर हे कात्रप भागातील श्री साईदीप इमारती खाली जेवणानंतर शतपावली करत होते. त्याच वेळीस बाजूच्या शुभम बार या हॉटेल मधून काही तरुण बाहेर पडले त्याच्यातील एक जण पोलीस अधिकारी कोहिनकर यांच्या इमारतीच्या गेटवर लघुशंका करीत असल्याने त्या तरुणास कोहिनकर यांनी हटकले. यामुळे त्या तरुणाला राग आल्याने, त्याने आणि त्याच्या मित्रांनी कोहिनकर यांना लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरवात केली.
या मारहाणीत कोहिनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या डोळ्याला २० टाके पडले आहेत. दरम्यान, कोहिनकर यांना स्पॉडिलेसिसचा त्रास असल्याने ते गेल्या एक महिन्यापासून सुट्टीवर होते आणि आजच ते कामावर रुजू होणार होते. मात्र काल ही घटना घडली आहे.
या प्रकरणी अज्ञात इसमान विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान हॉटेलच्या आत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत हे मारहाण करणारे टोळके कैद झाले असून या आधारे त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement