एक्स्प्लोर

सध्यातरी दिल्लीत जाण्याचा प्लॅन नाही : मुख्यमंत्री

'अशी चर्चा कुठे सुरु असते मला माहित नाही. बहुधा ही चर्चा मला तुमच्या माध्यमातूनच समजते. पण सध्या तरी माझा दिल्लीला जाण्याचा कोणताही प्लॅन नाही किंवा पक्षाचाही कोणताही तसा प्लॅन ऐकीवात नाही.’

मुंबई: व्यंकय्या नायडूंची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाची दारं उघडणारी ठरु शकते. अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. याचबाबत मुख्यमंत्र्यांना आज छेडण्यात आलं. एबीपी माझाच्या 'व्हिजन पुढच्या दशकाचं' या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्याविषयी उत्तर दिलं. 'अशी चर्चा कुठे सुरु असते मला माहित नाही. बहुधा ही चर्चा मला तुमच्या माध्यमातूनच समजते. पण सध्या तरी माझा दिल्लीला जाण्याचा कोणताही प्लॅन नाही किंवा पक्षाचाही कोणताही तसा प्लॅन ऐकीवात नाही.’ असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपच्या पार्लमेंटरी बोर्ड अर्थात संसदीय मंडळात व्यंकय्या नायडूंच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्णी लागू शकते अशी राजधानी दिल्लीत चर्चा सुरु आहे. पण मुख्यमंत्र्यांनीच आता हे वृत्त फेटाळलं असून आपण दिल्लीत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भाजपच्या संसदीय बोर्डात कोणाकोणाचा समावेश? संसदीय बोर्ड ही भाजपची राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेणारी सर्वात महत्वाची कमिटी आहे. यात सध्या एकूण 12 सदस्य आहेत. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा समावेश झाल्यास ते संसदीय बोर्डातले भाजपचे दुसरे मुख्यमंत्री ठरतील. सध्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे संसदीय बोर्डात आहेत. अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा समावेश संसदीय बोर्डात झाला, तरी ते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवत संसदीय बोर्डाची जबाबदारी पार पाडतील. शिवराजसिंह चौहान यांच्याप्रमाणेच एकाचवेळी ते दोन्ही कामकाज पाहू शकतात. संसदीय बोर्डातला समावेश याचा दुसरा अर्थ राष्ट्रीय स्तरावर भविष्यातला चेहरा म्हणून पक्ष त्यांना पाहतोय, असाही होतो. त्यामुळेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह, राजस्थानच्या वसुंधरा राजे शिंदे यांच्याआधी देवेंद्र फडणवीस यांचा या संसदीय बोर्डात खरंच समावेश होणार का याची उत्सुकता आहे. संबंधित बातम्या : व्यंकय्यांच्या उमेदवारीमुळे फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? LIVE : दिग्गजांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू

Embed widget