एक्स्प्लोर

युती होणार का? आशिष शेलार म्हणतात...

मुंबई: कोणाशीही छुपी युती करणार नाही. जे काही ठरेल ते कोअर कमिटीच्या बैठकीत ठरेल. मात्र पारदर्शकता हा मुद्दा कायम असेल. 'मी मॅन ऑफ दी मॅच नाही, तर टीम ऑफ दी मॅच' आहे. तसंच डबल सेंच्युरी कशी करायची हे विराट कोहलीकडून शिकायचंय, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. मुंबईतील विजयानंतर आशिष शेलार यांनी माझा कट्ट्यावर विविध मुद्द्यांवर गप्पा मारल्या. मुंबई महापालिकेत शिवसेेनेसोबत युती करणार का? असा प्रश्न शेलार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "याबाबत मी आताच काही बोलू शकत नाही. जो निर्णय होईल, तो कोअर कमिटीच्या बैठकीत होईल". विजयाचं श्रेय टीमला या विजयाचं श्रेय माझं नाही. आमच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयमी आणि विकासाचा चेहरा होता. अहंकार बाजूला ठेवून आम्ही विकासाचे मुद्दे जनतेसमोर नेले, त्यामुळेच जनतेनेही आमच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे भाजपला 31 वरुन तब्बल 82 इतक्या जागा मिळाल्या, असं शेलार म्हणाले. 82 चा आकडा समाधानकारक आहे, मात्र तो आणखी पुढे जाऊ शकला असता. 'भाजपने सबका साथ, सबका विकास' या ध्येयानेच वाटचाल केली. त्यामुळेच मराठीबहूल भागात भाजपला 27 जागा मिळाल्या. मराठी माणसानेही भाजपला कौल  दिला असा दावा शेलारांनी केला. निकाल लागला, आता रडीचा डाव खेळू नका भाजपने सत्ता-पैशाचा वापर करुन इतक्या जागा जिंकल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याबाबत शेलार म्हणाले, "आता निवडणुका झाल्या आहेत. जनतेचा कौल समोर आला आहे. मतदानापूर्वी पैसे, जाहिरातीबाबत का बोलला नाहीत, आता निकालानंतर का बोलता? त्यामुळे आता रडीचा डाव खेळू नका" राज ठाकरेंना 'दूरदृष्टी' पैसा जिंकणार की विकास हे राज ठाकरेंचं वाक्य म्हणजे पळवाट होती. कारण त्यांना आधीच पराभव दिसला होता, असं म्हणत राज ठाकरे यांना दूरदृष्टी होती त्यामुळेच त्यांनी असं वक्तव्य केल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावला. माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे
  • आमचं नेतृत्त्व संयमी होतं, अहंकार दूर ठेवायचा होता - आशिष शेलार
  • मराठीबहुल भागात भाजपला 27 जागा, मराठी माणसाचा कौल भाजपला - आशिष शेलार
  • मी मॅन ऑफ दी मॅच नाही, टीम ऑफ द मॅच आहे
  • पारदर्शकता हा मुद्दा आम्ही कायम पुढे ठेवला, तो जनतेने स्वीकारला-
  •  पारदर्शकता हा मुद्दा नेहमीच पुढे राहील, तोच मुद्दा जवळचा आहे
  • निकाल लागला आहे, आता रडीचा डाव टाकू नका, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला
  •  मतदानापूर्वी पैसे, जाहिरातीबाबत बोलले नाहीत, आता निकालानंतर का बोलता?
  • युतीच्या चर्चेबाबत आम्ही रात्री अडीच-तीनपर्यंत चर्चा करत राहायचो, मुख्यमंत्री पुन्हा सकाळी लवकर उठून कामाला लागायचे -
  •  त्यावेळी पारदर्शकता, विधानसभेच्या जागा आणि समान संधी या मुद्यावर युतीबाबत चर्चा सुरु होती
  • महापौर निवडीबाबत गट करायचा की नाही याबाबत कोअर कमिटीत चर्चा करु
  • मुंबई मनपात काही पक्षाच्या नेतृत्त्वाने राष्ट्रीय मुद्दे आणले
  •  शिवसेना-काँग्रेसमध्ये छुपी युती होती, यावर मी आजही ठाम आहे
  • वॉर्ड 191 मध्ये शिवसेना-काँग्रेसची छुपी युती होती, हे मी पुराव्याने सिद्ध करु शकतो
  •  देवेंद्र फडणवीस हे कमी बोलणारे आणि जास्त काम करणारे मुख्यमंत्री
  • विरोधक कमकुवत हे त्यांचं दु:ख, पण आम्ही गैर काहीच न केल्याने त्यांच्याकडे मुद्दाच नाही
  • भाजपमध्ये वन मॅन शो नाही, पण आमचं टीम वर्क आहे
  • देवेंद्र फडणवीस हे भाजपचा विकास चेहरा, त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात पुढे जाणं योग्यच
  • निवडणुकीत सर्व नेत्यांच्या सभा झाल्या, पण चेहरा देवेंद्र फडणवीस यांचा असणं स्वाभाविक आहे
  • आम्ही निवडणुकीत पातळी सोडून, मुद्दे सोडून टीका केली नाही, आम्ही कामावर टीका केली-
  • निवडणुकांमध्ये धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य असतं, ते झालंच पाहिजे
  • एकट्या आशिष शेलारवर टीका केली म्हणून काही होत नाही, निर्णय नेतृत्त्वाचा असतो -
  • मी वर्तमानपत्रं वाचतो, मुखपत्रं वाचत नाही
  • 'सामना'मुळे सामन्य शिवसैनिकाला सामना करावा लागतोय, याचा विचारा व्हावा
  • 'सामना'वर बंदी घाला अशी भाजपची कधीच मागणी नव्हती-
  •  'सामना' हे मुखपत्र, तर तरुण भारत हे वर्तमानपत्र
  •  उद्धव ठाकरेंनी काय बोलावं हे माझ्या हातात नाही
  •  पारदर्शकता हा मुद्दा कायम पुढे असेल
  • मतदार यादीत नाव नसणं हे खूप दुर्दैवी
  • चार दिवसापूर्वी यादी आली, मग स्लिप वाटपासारखी कामं कशी होणार?
  • 31 ची भाजपा 82 पर्यंत युतीशिवाय कशी पोहोचली, हा विश्लेषणाचा विषय आहे
  • सत्ता, अहंकार आणि जबाबदारी हे मुद्दे महत्त्वाचे, सेवक म्हणून काम करत राहू -
  • मुख्यमंत्र्यांनी मारलेल्या मिठीत भावूकता होती
  • पैसा जिंकणार की विकास हे राज ठाकरेंचं वाक्य म्हणजे पळवाट, त्यांना आधीच पराभव दिसला होता
  • कोणाशीही छुपी युती करणार नाही, जे काही होईल ते कोअर कमिटीत ठरेल - आशिष शेलार
  • राष्ट्रवादीच्या मदतीने आमचं सरकार टिकलं हा आरोप चुकीचा - आशिष शेलार
  • मराठी -अमराठी वाद करु नका, मुंबईकर सुज्ञ आहेत  - आशिष शेलार
  • युतीत सडलो असं कोणीही भाजप नेता म्हणणार नाही   - आशिष शेलार
  • युती तुटली, आता आम्ही खूप पुढे गेलो आहोत, जनतेने विश्वास दाखवला - आशिष शेलार
  • पक्षाने सांगितलं तर आजपासून 2019 च्या लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागेन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget