एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आशिष शेलार नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी, भाजपकडून जबाबदारीचे वाटप

भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. आशिष शेलार यांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे.

मुंबई : भाजपने नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप केले आहे. आशिष शेलार यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमले आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे. तर इतर महापालिका निवडणुकीसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

कोअर कमिटीच्या बैठकीत महापालिका निवडणुकीवर चर्चा मुंबईत मंगळवारी (5 जानेवारी) भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. आगामी काही दिवसात नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडण्यापासून ते निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षातील उमेदवारांना भाजपत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यावरही चर्चा झाली. बहुतांश महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण काही ठिकाणी शक्य असेल तर स्थानिक आघाडी करुन भाजप निवडणूक लढणार आहे.

Maha Gram Panchayat Election | ग्रामपंचायतीसाठी भाजपचे 12 नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अतुल भातखळकर प्रभारी दरम्यान 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून निवड केली होती. 18 नोव्हेंबर 2020 रोजी ही घोषणा झाली होती. शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. केवळ मुंबई महापालिकाच नाही तर आगामी सर्व महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने पक्षाने संघटनात्मक बैठकांमध्ये जबाबदारीचं वाटप केलं आहे.

भाजपमध्ये जबाबदारीचं वाटप

1. नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रमुख -गणेश नाईक निवडणूक सहप्रमुख - मंदा म्हात्रे निवडणूक संघटनात्मक प्रमुख - संजय उपाध्याय निवडणूक प्रभारी - आशिष शेलार

2. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रमुख - रवी चव्हाण निवडणूक प्रभारी - संजय केळकर.

3.औरंगाबाद महापालिका निवडणूक निवडणूक प्रमुख - अतुल सावे निवडणूक प्रभारी - गिरीश महाजन निवडणूक संघटनात्मक जबाबदारी - संभाजी पाटील निलंगेकर.

4. कोल्हापूर महापालिका निवडणूक निवडणूक प्रमुख - धनंजय महाडिक आणि महेश जाधव. निवडणूक प्रभारी - शेखर इनामदार, रणजित सिंह निंबाळकर

5. वसई-विरार महापालिका निवडणूक निवडणूक प्रभारी - प्रसाद लाड निवडणूक सहप्रभारी - जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Embed widget