एक्स्प्लोर

डोबिंवलीकरांची कोट्यवधींची फसवणूक करून सोने व्यापारी पसार

डोंबिवलीच्या मानपाडा रोडवर प्रथमेश ज्वेलर्स नावाने दुकान चालवणाऱ्या कोठारी याने ग्राहकांना अनेक ऑफर्स देत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली होती. रोख रकमेच्या बदल्यात व्याज, तर 10 तोळे सोन्याच्या मोबदल्यात वर्षाला दोन तोळे सोनं निव्वळ व्याज म्हणून देण्याची स्वप्नं त्यानं लोकांना दाखवली.

कल्याण : सोने व्यापाऱ्याने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. अजित कोठारी असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो दुबईत पळून गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

विजय मल्ल्या, निरव मोदी यांच्यासारखाच हा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. अजित कोठारी असं या सोनं व्यापाऱ्यांच नाव आहे. डोंबिवली शहरातील नामांकित सोनं व्यापारी असलेला कोठारी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झाला आहे आणि यामुळेच डोंबिवलीकर पुरते हवालदिल झाले आहेत.

डोंबिवलीच्या मानपाडा रोडवर प्रथमेश ज्वेलर्स नावाने दुकान चालवणाऱ्या कोठारी याने ग्राहकांना अनेक ऑफर्स देत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली होती. रोख रकमेच्या बदल्यात व्याज, तर 10 तोळे सोन्याच्या मोबदल्यात वर्षाला दोन तोळे सोनं निव्वळ व्याज म्हणून देण्याची स्वप्नं त्यानं लोकांना दाखवली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी त्याच्याकडे आयुष्यभराची पुंजी गुंतवली.

मात्र अचानक कोठारी हा दुकान बंद करून पळून गेला आणि ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी या सगळ्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

हिशोबी पैसे आणि दागिने होते, अशा 24 जणांनी आत्तापर्यंत पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. मात्र बेहिशोबी पैसे आणि दागिने गुंतवणाऱ्यांची संख्याही मोठी असून अनेकांनी कोठारीकडे किलो किलो सोनं ठेवल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कोठारीला शोधून काढण्याची मागणी खुद्द राज्यमंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

ग्राहकांच्या पैशातून कोठारी याने डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि थेट दुबईतही मालमत्ता विकत घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फसवून पळालेल्या कोठारीला लवकरात लवकर शोधून काढावं, अशी मागणी गुंतवणूकदारांमधून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
Nitin Gadkari ethanol: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
Sushma Andhare On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती

Embed widget