Antilia Security : दोन संशयास्पद व्यक्तींनी मुकेश अंबानींच्या निवासस्थानाचा पत्ता विचारला, अँटिलिया परिसराची पोलिसांकडून नाकाबंदी
Mumbai News: एका टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अज्ञात व्यक्तींनी मुकेश अंबानीच्या निवासस्थानाचा पत्ता विचारला. त्यांच्याकडे एक बॅग होती
Antilia News: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानीच्या निवासस्थानाचा पत्ता दोन संशयास्पद व्यक्तींनी विचारला असल्याचं समोर आलं आहे. टॅक्सी ड्रायव्हरनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. ऊर्दूमध्ये बोलणाऱ्या दोघांनी पत्ता विचारला असल्याची माहिती टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांन दिली आहे. अँटिलिया परिसराची मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.
अँटिलियामध्ये 27 मजले आहेत. या घराची किंमत जवळजवळ 6000 कोटी आहे. तर डॉलरमध्ये याची किंमत 2 बिलियन डॉलर (जवळजवळ 125 अब्ज रुपये ) एवढी आहे. ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार एका दाढीवाल्या व्यक्तीने किला कोर्टसमोर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अंबानीच्या घराचा पत्ता विचारला. ज्या संशयित व्यक्तींनी पत्ता विचारला त्यांच्याकडे सिल्व्हर रंगाची वॅगनर कार होती. दोघेही व्यक्ती ऊर्दू भाषेत बोलत होते आणि त्यांच्याकडे एक बॅग होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले असून नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी कारच्या नंबरद्वारे त्यांची माहिती मिळवण्यासाठी आरटीओशी संपर्क केला परंतु त्यांच्याकडे माहिती मिळाली नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Security heightened outside Mukesh Ambani's residence 'Antilia' after Mumbai Police received a call from a taxi driver that two people carrying a bag asked for Ambani's residence. pic.twitter.com/RW5uMtcleK
— ANI (@ANI) November 8, 2021
26 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांचं मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला होता. पोलिसांना कारमध्ये एक बॅग सापडली होती. त्यामध्ये एक चिट्ठी देखील सापडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात एनआयएने सचिन वाझे, सुनील माने, रियाजद्दीन काजी, प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.