सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून प्रवेश करणाऱ्या कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण असलेल्या नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र ज्या नागरिकांच्या कोव्हिड लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या नाहीत अशा नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कोरोना लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा RTPCR चाचणीचा अहवाल नसल्यास अशा प्रवाशांची मोफत Rapid Antigen Test (RAT) तपासणी जिल्ह्याच्या सीमेवर किंवा रेल्वे स्टेशनला केली जाईल. 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांचे प्रवेशास RTPCR चाचणी अहवाल आवश्यक नाही अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या.
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची महसूल, आरोग्य व पोलीस पथकामार्फत जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी चेक पोस्टवर, रेल्वे स्टेशन व बस स्थानकावर नोंदणी करण्यात यावी.
गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संपन्न, गेल्यावर्षीची नियमावली कायम
मुंबई, पुणे किंवा जिल्हयाबाहेरुन एस.टी. बसमधून येणाऱ्या प्रवाशांची माहिती, बस ज्या ठिकाणाहून सुटेल त्याच ठिकाणी विहीत नमुन्यामध्ये दोन प्रतीत भरावी. त्याची एक प्रत जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी चेक पोस्टवर जमा करून घ्यावी. सदर माहितीची दुसरी प्रत वाहनचालक यांनी तालुक्याच्या एसटी डपोमध्ये जमा करावी. एसटी विभागाने सदर माहिती संकलीत करण्याकरिता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी सदर माहिती संबंधित तहसील कार्यालयात रोजच्या रोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमा करावी.
सलग दुसऱ्या वर्षी मुख्य मंदिरामध्येच होणार 'दगडूशेठ'चा गणेशोत्सव, ऑगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर
- खाजगी किंवा एसटी बस चालक आणि वाहकांनी कोविड चाचणी अगोदरच केली असणे आवश्यक असेल. तसे न केल्यास गाडी पोहोचण्याच्या ठिकाणावर चाचणी करावी. खाजगी किंवा एसटीतील प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझारचा व्यवस्थित वापर करणे अनिवार्य आहे.
- चेकपोस्टवर कार्यरत कर्मचारी यांनी लहान खाजगी वाहनांच्या (Car – Light Vehicle) चालकाकडून गाडीनंबर आणि प्रवासी संख्या व एका प्रमुख व्यक्तीचा मोबाईल क्रमांक, नाव व पत्ता याची माहिती घ्यावी.
- रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांची यादी संबंधित उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त करुन घ्यावी. रेल्वेमार्गे येणाऱ्या नागरिकांची नोंद करुन घेण्याकरिता आपले स्तरावरुन पथके नियुक्त करावीत. सदर प्रवाशांची तालुकानिहाय यादी दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय व तहसिलदार यांच्याकडे पाठवावी
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ, एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- प्रवाशांच्या याद्या ग्राम नियंत्रण समितीकडे प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी दोन डोस न घेतलेले व 72 तासापूर्वी कोरोना चाचणी अहवाल न आणणाऱ्या जिल्हयाबाहेरुन आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचे सूक्ष्म नियोजन करावे.
- चाचणीमध्ये बाधित आढळणाऱ्या किंवा लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यांत यावे. तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणासाठी संबंधित गटविकास अधिकारी/ तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार यांनी ग्रामस्तरावर इमारतीचे नियोजन करावे. यामध्ये ग्रामस्थांच्या सहभागाने केंद्र निश्चित करावे.
- कोरोना चाचणीस व कोरोना बाधित व्यक्तीच्या विलगीकरणास विरोध करणाऱ्या व्यक्तींवर पोलीसांमार्फत कारवाई करण्यात यावी.
- दुकानदार, भाजी, फळ, फूले विक्रेते व ग्राहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर संबंधित दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- गणेशमूर्ती विसर्जनकामी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनास पूर्ण बंदी आहे
- रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सव कालावधीत रेल्वेचे वेळापत्रक उपलब्ध करुन घेऊन रेल्वेच्या वेळापत्रकानुसार एस.टी.बसेस उपलब्ध करुन देणेबाबत याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनवरुन गावात जाण्यासाठी एस.टी. बसेसची संख्या वाढवावी.
- महामार्ग पोलीसांनी Black spot च्या ठिकाणांवर वाहनांचा वेग मर्यादित राहतील व अपघांतांना आळा बसेल असे नियोजन करावे.
- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून सिंधुदुर्गकरांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.