मुंबई : गेल्यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावटं होतं. त्यामुळे गेल्यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा यासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. यामध्ये गतवर्षीच्या नियमवाली कायम राहील असं ठरलं आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येईल. 


सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट, तर घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी. तसेच गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांनी घ्यावी, अशा अटी असणार आहेत. 


गणोशोत्सवासाठी नियमावली काय आहे?



  • सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट. 

  • घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी

  • गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळानी घ्यावी. 

  • 84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाण. 

  • विसर्जन ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती द्यावी लागेल. 

  • नंतर महापालिकेमार्फत गणेश विसर्जन होणार.  

  • सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी केवळ 10 कार्यकर्त्यांना परवानगी मिळणार. 

  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाला जाऊ नये.

  • मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी.