एक्स्प्लोर
Advertisement
अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग माफियांचं कंबरडं मोडलं, 15 कोटींचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक
मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचं हब बनत चाललं आहे. हे रोखण्यासाठी ड्रग्स तस्करीच्या विरोधात होणाऱ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचं हब बनत चाललं आहे. हे रोखण्यासाठी ड्रग्स तस्करीच्या विरोधात होणाऱ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अमली पदार्थ विरोधी पथक वेळोवेळी कारवाई करत असते. गेल्या काही महिन्यात अॅन्टी नार्कोटिक्स सेलने मुंबईत जवळपास 15 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचे ड्रग जप्त केले आहे. कोकेन या अत्यंत घातक ड्रग्जची सप्लाय चेन उध्वस्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी खार परिसरातून एका आफ्रिकन नागरिकाला (बोनाव्हेंचर एंझुवेचुक्कू एनवुडे असे त्याचे नाव आहे.) एक किलो 20 ग्राम वजनाच्या उच्च प्रतीच्या कोकेन ड्रगसोबत अटक केली आहे.
हा आरोपी दिल्लीवरून ड्रग्ज घेऊन मुंबईत येत होता. तसेच तो नवी मुंबईत राहतो. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय ड्रग मार्गेटमधून ड्रग्ज सर्वात आधी दिल्लीत आणले जातात. त्यानंतर तिथून ड्रग्ज मुंबईत आणले जातात. मुंबईमधून ते देशभर पोहोचवले जातात.
नार्कोटिक्स सेलने गेल्या सहा महिन्यात 15 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. यामध्ये चार परदेशी ड्रग माफियांना अटकदेखील करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात आफ्रिकन नागरिक जॉन फ्रेनीम आणि इजीके हे एक किलो 5 ग्रॅम कोकेनसह आणि मे महिन्यात डेव्हिड ओल टुबालाई याला 510 ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आली होती. आता बोनाव्हेंचर एंझुवेचुक्कू एनवुडे याला एक किलो कोकेनसह अटक केली आहे. विशेष म्हणजे हे चारही आरोपी आंतरराष्ट्रीय बाजारातून कोकेन भारतात आणणाऱ्या चेनचे सुत्रधार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement