Anil Deshmukh Bail : मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती
Anil Deshmukh Bail Stay : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मात्र देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.
Stay on Anil Deshmukh Bail Order : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन (Bail) मंजूर करण्यात आला पण सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती (Stay on Bail Order) देण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिला. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली.
देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती
देशमुखांना जामीन मंजूर केल्याच्या न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामिनाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. तेरा महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे, मात्र सध्या अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच असणार आहे.
पुढचे 10 दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच (Stay on Anil Deshmukh Bail Order)
अनिल देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुखांना उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना देशमुखांचं पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्य करणे अशा अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे पुढचे 10 दिवस अनिल देशमुख यांना तुरुंंगातच राहावं लागणार आहे.
अनिल देशमुखांचे वकील इंदरपाल यांनी माध्यमांना माहिती देत सांगितलं की, उच्च न्यालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला. त्यानंतर सीबीआयने विनंती करत देशमुखाच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य करत देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती दिली.
नोव्हेंबर 2021 पासून देशमुख तुरुंगात
1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.