Andheri East by Poll : अंधेरीचा निकाल नोटाला की शिवसेनाला?
Andheri East By poll: '166 अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल काही तासातच समोर येणार आहे. या अंधेरी पोट निवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत.
![Andheri East by Poll : अंधेरीचा निकाल नोटाला की शिवसेनाला? Andheri East by Poll Andheri result for Nota or Shiv Sena Andheri East by Poll : अंधेरीचा निकाल नोटाला की शिवसेनाला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/05/25f3b4b42140fd7747836ed123d8df13166763940135389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Andheri East by Poll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, या शेवटच्या तासांमध्ये निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या निवडणुकीत अत्यंत कमी मतदान झाले आहे. बहुतांश मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र मतदनाच्या दिवशी पाहयला मिळाली. तसेच या निवडणुकीत नोटाला जास्त मत पडतील अशी चर्चा देखील आहे.
'166 अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल काही तासातच समोर येणार आहे. या अंधेरी पोट निवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी 31.74% इतक मतदान झालं. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच पारड जड असलं तरी काही अनपेक्षित निकाल ही लागू शकतो अशी चर्चा देखील सध्या जोरदार आहे.
166 - अंधेरी पूर्व' विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे 31.74 टक्के मतदान झाले. या मतदार संघात एकूण मतदान 2, 71, 502 इतकं आहे. त्यापैकी 84,166 लोकांचं मतदान केलं आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार उभे होते त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि इतर अपक्ष असेच सहा उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे कोणाला किती मतदान झालं असेल याबाबत सांगता येतं नाही. मात्र या निवडणुकीत पडद्यामागून 'नोटा'ला मत टाका, असा प्रचार केला गेला,आणि नोटाला काही मत मिळू शकतात याची चर्चा सध्या निकालापूर्वी जोरदार सुरू आहे. तसेच जिंकणाऱ्या उमेदवाराप्रमाणे नोटाला देखील अधिक मत पडतील अशी देखील चर्चा रंगली आहे.
2019 च्या अंधेरी निवडणुकीतील आकडेवारी
- 2019 च्या निवडणुकीत एकूण 53.55 टक्के मतदान
- यात एकूण मतदानापैकी 42.67 टक्के मतदान दिवंगत रमेश लटके यांना मिळालं होतं
- तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुरजी पटेल यांना 31.74 टक्के मतं मिळाली होती
- तर काँग्रेसच्या अमीन शेट्टी यांना 19 टक्के मत मिळाली होती
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके या फक्त प्रमुख पक्षाच्या उमेदवार आहेत. भाजपने माघार घेतली आहे तर काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर इतर दुसरा अपक्ष उमेदवार देखील ऋतुजा लटके यांना आव्हान देण्याइतका ताकदवान नाही. त्यामुळे जरी ऋतुजा लटके यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नोटाचा वापर झाला किंवा नोटा पर्यायाला लटकेंपेक्षा जास्त मतं मिळाली तरीही त्यांचा विजय होऊ शकतो असे जाणकार सांगतात.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाला काहीच तास शिल्लक आहेत. त्यात या निकालामध्ये ऋतुजा लटके यांना 41 हजार, नोटाला 43 हजार आणि अपक्षांना सात हजाराच्या आसपास मतं पडतील अशा सोशल मीडियावर पोस्ट देखील फिरत आहेत. मतदानापूर्वीच हा सर्व्हे खोटा असल्याचं ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी खुलासा केला आहे. मात्र निकालापूर्वी पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगल्याने निकाल कोणाच्या बाजूने लागतोय हे प्रत्यक्ष निकाल समोर आल्यावरच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)