एक्स्प्लोर

Yashshree Shinde Murder: दाऊदने यशश्रीची हत्या का केली? प्रेमाचा अँगल समोर, शाळेपासून मैत्री, लग्नासाठी तगादा लावल्याचं उघड

Yashshree Shinde Murder: जुनी ओळख, लग्नाला नकार आणि हत्या दाऊदने पोलिसांनी सांगितलं हत्येचं खरं कारण, यशश्रीला शिवीगाळ केल्याप्रकरणी शेखविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल

राज्यासह देशाला हादरवलेल्या नवी मुंबईच्या उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात (Yashashri Shinde Case) मोठी माहिती समोर आली आहे. यशश्री हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला काल(मंगळवारी) पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आरोपीला उरणमध्ये आणण्यात आलं. पोलिसांनी दाऊद शेखची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी आरोपीने यशश्रीची निर्घृणपणे हत्या का केली याचे कारण देखील सांगितली आहेत. दाऊद शेखने यशश्रीची हत्या लग्नाला नकार दिला म्हणून केली असल्याची कबूली दिली आहे. 

दाऊद शेख आणि यशश्री यांची अनेक वर्षापासून ओळख

दाऊद शेख आणि मयत यशश्री एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत होते. शालेय जीवनापासून त्यांची मैत्री असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दाऊद शेखने यशश्रीला (Yashashri Shinde Case) लग्नासाठी मागणी घातली होती त्याचबरोबर लग्नासाठी मागे तगादा लावला होता. लग्न करून बेंगलोर येथे स्थायिक होण्यासाठी दाऊद यशश्रीच्या मागे लागला होता. मात्र यासाठी यशश्रीने नकार दिला. 25 जुलै रोजी तो यशश्रीला भेटण्यासाठी आला असता दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर दाऊदने तिची हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. 

यशश्री (Yashashri Shinde Case) आणि दाऊद एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यामध्ये 3 ते 4 वर्षांपासून मैत्री होती. यशश्री उरणमध्ये जिथे ठिकाणी राहत होती तिथेच दाऊद देखील राहायचा. पण 2019 मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी दाऊद विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा दाऊद जेलमध्येही गेला होता. त्यानंतर तो कर्नाटकला गेला. दाऊद पुन्हा उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशश्रीशी फोनद्वारे संपर्क केला. त्यावेळी दोघांनी भेटायचं ठरवलं होतं. या भेटीवेळी यशश्रीने लग्नाला नकार दिला त्यामुळे चिडलेल्या दाऊदने तिची हत्या केली.

दाऊदवर हत्या आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल 

दाऊद शेखवरती हत्या आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत यशश्रीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाऊदविरोधात ॲट्रोसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, यशश्रीची (Yashashri Shinde Case) हत्या करणाऱ्या दाऊदला अटकेनंतर आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टाकडून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकमधील गुलबर्गामधून अटक केली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. लग्नाला नकार दिल्यानं यशश्रीची हत्या केल्याचं दाऊदने पोलिसांना सांगितलं आहे. 

पोलिसांच्या हाती दाऊद शेख कसा लागला?

नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकमधून ताब्यात घेतले. यशश्री शिंदे (Yashashri Shinde Case) हिची हत्या झाल्यापासून दाऊद फरार होता. दाऊद शेख याचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तब्बल सात पथकं तयार केली होती. अखेर चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना दाऊदच्या मुसक्या आवळण्यात यश आले. यशश्रीची हत्या झाल्यानंतर दाऊद फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते, परंतु दाऊद शेख सातत्यानं लोकेशन बदलत होता. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमध्ये पकडलं आहे. 

छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला यशश्रीचा मृतदेह

उरण येथील 22 वर्षीय यशश्रीची निर्घृण हत्या करण्यात आली. यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत शनिवारी(ता.27) आढळून आला. यशश्रीची हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली होती. तिचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. यशश्री शिंदे काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरु असतानाच तिचा मृतदेह उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपामध्ये आढळला होता. हत्या होऊन तीन दिवस झाल्यानंतर, मारेकऱ्यांना पकडण्यात उरण पोलिसांना यश आलेलं नव्हतं यामुळे संतप्त झालेल्या उरणवासियांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा देखील काढला. त्यानंतर पोलिसांनी सुत्र हलवली आणि आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने तपास सुरू केला.

VIDEO - लग्नासाठी नकार दिल्यानं तिचा जीव घेतला, आरोपी दाऊदची कबुली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget