एक्स्प्लोर

POP Ganesh Idol : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा POP मूर्तीची मुभा, प्रतिज्ञापत्रातून 4 फूट उंचीची अट वगळली

सार्वजनिक गणेश मंडळांसाठीच्या प्रतिज्ञापत्रात 4 फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट हटवण्यात आली आहे. यामुळे गणेश मंडळांना यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganesh Utsav 2023) जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसाठीच्या प्रतिज्ञापत्रात 4 फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट हटवण्यात आली आहे. यामुळे गणेश मंडळांना यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती (POP Ganesh Idol) बनवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि समन्वय समितीच्या बैठकीत गुरुवारी (10 ऑगस्ट) हा निर्णय घेण्यात आला.

प्रतिज्ञापत्रातील 4 फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तींच्या बंधनाची अट हटवली

मुंबईत 12 हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं तर 1 लाख 90 हजार ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये मंडप बांधून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांना पालिकेची रीतसर परवानगी घेणं बंधनकारक असतं. मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी 'एक खिडकी' पद्धतीने ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी राज्य सरकार, पालिका आणि समन्वय समितीच्या बैठकीनुसार यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आणि उंच बनवण्याचा मार्ग मोकळा झाला असताना पालिकेच्या ऑनलाईन हमीपत्रात मात्र 4 फूट आणि पर्यारवणपूरक मूर्तीची अट घालण्यात आल्याने मंडळं संभ्रमात होती. यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यातही अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समितीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार काल ही बैठक पार पडली, ज्यात प्रतिज्ञापत्रातून 4 फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तींच्या बंधनाची अट हटवली आहे.

राज्य सरकारने हायकोर्टात काय म्हटलं होतं?

यंदा सुद्धा पीओपीच्या मूर्तींवर बंदीच आहे. राज्य सरकारने त्यासाठी एक अस्थायी धोरणही तयार केले आहे, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी (7 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) दिली होती. उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या उप सचिवांनी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केलं होतं.

यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय

मुंबई महानगरपालिकेने गणेश विसर्जन सोहळ्यात कमतरता भासू नये, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा मुंबईमध्ये विसर्जनासाठी 308 कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर 69 नैसर्गिक विसर्जन स्थळी गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Ban On PoP Ganesh Idol : यंदा गणेशोत्सवासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी, नाशिक महापालिकेचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget