एक्स्प्लोर

महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनात या योजनेतील अनुदानात वाढ

मुंबई : महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच महिला उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या पिंक (गुलाबी) ई-रिक्षा (Auto rikshaw) योजनेत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. त्यानुसार, या योजनेंतर्गत यापूर्वी देण्यात येणाऱ्या 20 टक्के अनुदानात वाढ करण्यात आली असून आता हे अनुदान 40 टक्के देण्यात येणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू केली होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेतील शासनाच्या अनुदानात वाढ, लाभार्थी महिलांचा कर्जभार कमी करणे, पूर्वीच्या लाभार्थींनाही वाढीव अनुदानाचा लाभ देणे आणि योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी व सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

योजनेतील प्रमुख निर्णय पुढीलप्रमाणे 

1) शासनाचे अनुदान दुप्पट

"पिंक (गुलाबी) ई-रिक्षा" योजनेअंतर्गत ई-रिक्षा खरेदीसाठी यापूर्वी देण्यात येणारे 20 टक्के शासन अनुदान वाढवून 40 टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलेचा आर्थिक हिस्सा 60 टक्के राहणार आहे.

2) सुलभ वित्तपुरवठा

योजनेअंतर्गत लाभार्थीच्या 60 टक्के आर्थिक सहभागामध्ये किमान १० टक्के स्वभांडवल असणार आहे. उर्वरित 50 % रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी "Partial Deferred Payment Facility" द्वारे अथवा नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका किंवा अनुज्ञेय खासगी बँकांकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

3) पूर्वीच्या लाभार्थींनाही वाढीव अनुदानाचा लाभ

योजनेअंतर्गत यापूर्वी पिंक ई-रिक्षा प्राप्त झालेल्या लाभार्थी महिलांनाही दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्या घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी पूर्वीच्या २० टक्के अनुदानाऐवजी 40 टक्के शासन अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

4) जिल्हानिहाय फेरवाटप

योजनेअंतर्गत राज्यातील 8 जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचाही समावेश करण्यास आणि लाभार्थी संख्येचे जिल्हानिहाय फेरवाटप करण्याचे अधिकार महिला व बाल विकास मंत्र्यांना देण्यात आले आहेत.

5) अनुदान वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ

योजनेतील लाभार्थींना शासनाचे अनुदान आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या कार्यालयामार्फत वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुदान वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होईल.

6) अंमलबजावणीसाठी आवश्यक बदल करण्याचे अधिकार

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी निर्माण झाल्यास आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार मा. महिला व बाल विकास मंत्री* यांना देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.
महिला उद्योजकतेला चालना मिळण्याबरोबरच महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेने राज्य शासनाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

हेही वाचा

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Vileparle Shanta Bhavan Building Fire: मुंबईतील विलेपार्लेमधील इमारतीला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू; इमारतीच्या 11 व्या मजल्यावर काय घडलं?
मुंबईतील विलेपार्लेमधील इमारतीला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू; इमारतीच्या 11 व्या मजल्यावर काय घडलं?
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget