एक्स्प्लोर

Central Railway : लोकल अन् रेल्वेतून प्रवास विनातिकीट करणाऱ्यांवर मध्य रेल्वे सर्जिकल स्ट्राईक करणार, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवणार?

Central Railway : रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेनं रेल्वे बोर्डाकडे नवा प्रस्ताव पाठवला आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळानं लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या दंडाची रक्कम 20 वर्षांपूर्वी वाढवण्यात आली होती. 2004 मध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आली होती. आता मध्य रेल्वेकडून दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. 

मध्य रेल्वेनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 115 कोटी रुपये वसूल केले होते. मध्य रेल्वेनं 20 लाख 56 हजार विनातिकीट प्रवाशांकडून ही रक्कम वसूल केली आहे. तर, पश्चिम रेल्वेनं 46 कोटी रुपये वसूल केले आहेत. 9 लाख  62 हजार प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेच्या विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक  बी. अरुण कुमार यांनी  मुख्य व्यवस्थापक वाणिज्यिक व्यवस्थापक (प्रवासी सेवा) यांना रेल्वे बोर्डाकडे  विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याताबत पत्र पाठवलं आहे. 

2004 मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडाची रक्कम 50 रुपयांवरुन 250 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाही. नव्यानं सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, एसी लोकल याचा विचार करता दंडाची रक्कम वाढवावी,असा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे. महागाईचा विचार करता दंडाची रक्कम वाढवावी, असा प्रस्ताव आहे. मुंबईतील लोकलचा विचार केला असता रात्रीच्यावेळी एसी लोकल मध्ये रात्रीच्यावेळी  विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते.

टीसींवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ

लोकलमध्ये प्रवास करताना देखील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करण्याचे अधिकार टीसींना देण्यात आलेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून टीसींवरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.  पश्चिम रेल्वेत तैनात असलेल्या 29 वर्षीय तिकीट तपासणीसाला एका प्रवाशाने हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना घडली  आहे. विजयकुमार पंडित असं 29 वर्षीय तिकीट तपासणीसाचं नाव आहे.

गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8.53 वाजता नालासोपारा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक प्रवाशी फर्स्ट क्लासच्या डब्यातून उतरला, टीसीने त्याचं तिकीट तपासल्यावर त्याची तिकीट सेकंड क्लासच्या डब्याचं असल्याचं निदर्शनास आलं. टीसीने त्या प्रवाशाला दंड मारला. मात्र एक तासाने पुन्हा तो प्रवासी  नालासोपारा रेल्वे स्थानकावर आला आणि त्यानं हॉकी स्टिकने मारहाण केली.

इतर बातम्या :

Mhada : ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget