एक्स्प्लोर
Advertisement
रहेजा स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन
मुंबई : मुंबईतील एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी आज मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. विविध मागण्यांसाठी विद्यार्थी भारती संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
फाऊंडेशन आणि एलिमेंट्री प्रवेशाला सुरुवात व्हावी. तसंच 5400 रुपयांऐवजी दहा हजार रुपये फी घेतली, ती परत करावी आणि संस्थेचा कारभार नीट चालण्यासाठी प्रसाशकीय अधिकारी नेमावा, या मागण्यांसाठी एल. एस. रहेजा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
मागील काही महिन्यांपासून अनेकदा मागणी करुनही कारवाई होत नसल्याने या विद्यार्थ्यांनी थेट मंत्रालयावर ध़डक दिली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात घोषणाबाजीही केली.
आंदोलनादरम्यान सुमारे 100 विद्यार्थ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर पोलिस उपायुक्त मनोज कुमार शर्मा यांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांना केला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
निवडणूक
Advertisement