एक्स्प्लोर

उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सध्या आहे.

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सध्या आहे. हिंदुत्व आणि सावरकरांवरुन भाजप नेहमीच शिवसेनेला लक्ष्य करत असते. या पार्श्वभूमीवर भाजपला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांचे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पोंक्षे हे नाव महाविकासआघाडीतील राष्ट्रावादी आणि काँग्रेसला चालणार आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही.

विधान परिषदेवर 12 आमदारांना नियुक्त करण्यासाठी राज्यपाल कडक नियम लावणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रत्येक पक्ष राज्यपाल ग्राह्य धरतील अशीच नावे देण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पोंक्षे यांचं नाव याच चौकटीत बसणारे आहे. शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकर यांच्यावरुन भाजप नेहमीच टार्गेट करत असते. त्यासाठी शरद पोंक्षे हे नाव परफेक्ट समजले जात आहे. पोंक्षे हिदुत्व आणि विशेषतः सावरकरवादी असल्याने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा : संजय राऊत

मात्र, महाविकासआघाडील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना हे नाव चालणार आहे का? कारण, सावरकर मुद्द्यावरुन पोंक्षे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी नेहमीच मदतभेद राहिले आहेत. दरम्यान, एबीपी माझाने शरद पोंक्षे यांना संपर्क साधला असता यासंदर्भात मला अद्याप विचारणा झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पोंक्षे यांना महाविकासआघाडीकडून उमेदवारी देऊ नये : आरपीआय शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत चर्चेत असल्याचे समजते. अस्पृश्यतानिवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षे यांना महाविकासआघाडीकडून उमेदवारी देऊ नये, अशी विनंती आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिलीय.

शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याबाबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा होकार?

शिवसेना हा वेगळा पक्ष आहे, बघू, त्यांना अधिकार आहे आपली नावे ठरवण्याचा. पण आम्ही खूप विचार करून चांगले उमेदवार दिले आहेत, अशी प्रतिक्रिया उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. तर पोंक्षेवर आता बोलण्यात काही अर्थ नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

प्रत्येक चॅनलची यादी वेगळी : खासदार संजय राऊत विधानपरिदषदेच्या उमेदवारांची चर्चा चॅनेलवरच आहे. प्रत्येक चॅनलची यादी वेगळी आहे. मुख्यमंत्री जर कोणाशी बोलणी करत असतील तर ते गोपनीय राहतं. त्याची अशी चर्चा होत नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेते शरद पोंक्षे यांच्या नावांबद्दल होणाऱ्या चर्चेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

Sharad Ponkshe | विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांच्या नावाची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget