एक्स्प्लोर
Advertisement
खडसेंच्या राजीनाम्यासाठी दमानियांचं उपोषणास्त्र
मुंबई : मित्रपक्ष शिवसेनेकडून एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही खडसेंविरोधात उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे.
अंजली दमानिया यांनी आझाद मैदानात एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणीसाठी ठिय्या मांडला आहे. खडसेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी. तसंच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि सहा महिन्यात भ्रष्टाचार प्रकरणाचा निकाल लावावा, असं म्हणत दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी घोषणा करणारे, खडसेंवरील गंभीर आरोपांनंतरही गप्प का आहेत, असा सवाल दमानिया यांनी विचारला आहे.
दरम्यान, अण्णा हजारेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी अंजली दमानिया यांनी कालच राळेगणसिद्धीमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
राजकारण
राजकारण
Advertisement