एक्स्प्लोर
निवासी वसाहतीत विनापरवानगी फटाके स्टॉलवर कारवाई होणार
मुंबई : निवासी वसाहतींमध्ये विनापरवानगी फटाक्याची दुकानं उघडणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा दुकानं थाटून फटाक्यांचा साठा आणि विक्री करणार्यांविरोधात तात्काळ कारवाईचा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
फटाक्यांचा स्फोट झाल्यास होणारी जीवितहानी ही गंभीर बाब आहे. निवासी वसाहतींत बेकायदा दुकाने थाटून फटाक्यांचा साठा करणार्यांचे केवळ परवाने रद्द करुन भागणार नाही तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे, असं मतही खंडपीठाने नोंदवलं आहे.
फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी निवासी वसाहतींमधील फटाक्यांच्या बेकायदा दुकानांवर कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शाळातून जनजागृती केली जात असल्यामुळे हे प्रमाण कमी होत आहे. अशीच जनजागृती सर्वत्र केली पाहिजे अशा शब्दांत न्यायालयाने मुंबईचे कौतुक केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement