एक्स्प्लोर

भिवंडीत मनपाच्या घंटागाडीने सहा वर्षीय मुलाला चिरडले

घंटागाडी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घंटागाडी चालकाकडे वाहनाचा परवाना देखील नाही. महानगरपालिका विनापरवाना घंटागाड्या चालवत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भिवंडी : भिवंडी शहरातील सलामतपुरा परिसरात मनपाच्या घंटागाडीने एका सहा वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत रोहित विजय लोंढे (6) असे मयत मुलाचं नाव आहे. घटनेनंतर स्थानिकांनी घंटागाडी चालकाला बेदम चोप दिला आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. मात्र स्थानिकांनी तसेच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. घटना घडली त्यावेळी मुलाचे वडील जेवण करण्याकरिता बाहेर गेले होते. त्यांच्या शोधात मुलाची आई आपल्या मुलासह बाहेर पडली होती.  मात्र रस्त्यातच मागून येणाऱ्या घंटागाडीने त्यांचा रोहितला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी घंटागाडी चालकाला भररस्त्यात बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मात्र स्थानिक तसेच नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्याची समजूत घालून त्यांना शांत केलं. घंटागाडी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घंटागाडी चालकाकडे वाहनाचा परवाना देखील नाही. महानगरपालिका विनापरवाना घंटागाड्या चालवत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार! वेतन कराराचा फेरविचार करा, अन्यथा 15 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार! वेतन कराराचा फेरविचार करा, अन्यथा 15 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार
Ajit Pawar : छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांच्या जीवनप्रवासाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना, सुनेत्रा पवार भावूक
छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांच्या जीवनप्रवासाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना, सुनेत्रा पवार भावूक
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
Embed widget