एक्स्प्लोर
आजपासून एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार
लोकलच्या गर्दीला कंटाळलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता सुखद आणि गारेगार होणार आहे. कारण मुंबईकरांची एसी लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आजपासून नाताळच्या मुहूर्तावर बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.

मुंबई : लोकलच्या गर्दीला कंटाळलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता सुखद आणि गारेगार होणार आहे. कारण मुंबईकरांची एसी लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आजपासून नाताळच्या मुहूर्तावर बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
आज सोमवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पहिली ऐसी लोकल बोरीवलीवरुन चर्चगेटसाठी रवाना होईल. त्यानंतर चर्चगेट ते विरार या जलद मार्गावर ही लोकल धावेल. दिवसाला 12 फेऱ्या ही लोकल करेल. मात्र 1 जानेवारीपर्यंत एसी लोकलच्या केवळ 6 फेऱ्याच चालवल्या जाणार आहे.
एसी लोकलची अंतिम चाचणी काल रविवारी चर्चगेट ते अंधेरी आणि पुन्हा अंधेरी ते चर्चगेट अशा रेल्वेस्थानकांदरम्यान घेण्यात आली.
देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल.
या गाडीचे तिकीट 60 ते 205 रुपयांपर्यंत असेल, तसंच या लोकलसाठी आठवड्याचा आणि मासिक पासही उपलब्ध असेल.
एसी लोकलचं वेळापत्रक
26/12/17 ते 29/12/17
1 जानेवारी 2018 पासून नियमित वेळापत्रक
एसी लोकलचे तिकीटदर
1 जानेवारी 2018 पासून नियमित वेळापत्रक
एसी लोकलचे तिकीटदर
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















